नांदेड| शहरात काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे रस्त्याच्या कडेला चिखलाचे साम्राज्य झाले असून, यामुळे दोन दुचाक्या समोरासमोर धडकून एका युवकाचा बळी गेला आहे. हि घटना मध्यरात्रीला मालेगाव रोडच्या तुळशीराम नगर नजीक घडली आहे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव स्वप्नील ढवळे असून, अन्य दोन युवक या अपघातात जखमी झाले आहेत.
नांदेड शहरातील तरोडा भागातील रस्त्याचे कामे मागील काळात करण्यात आली मात्र रस्त्याची निर्मिती करताना गुत्तेदाराने कामाचा दर्जा राखला नसल्याने या भागात काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. याच भागातील रस्त्यावर मागल्या काळातही अनेक अपघात झाले आहेत. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने आज पावसाच्या पाण्याने झालेल्या चिखलामुळे हा अपघात झाला असल्याचे घटनसाठाळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले आहे.
रात्रीला अपघात झालेल्या परिसरात रस्त्यात नाला आहे, या नाल्याचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने येथे चिखलमय वातावरण निर्माण होते आहे. परिणामी वाहनांची ये-जा होताना घसरगुंडी होत असून, यामुळे ये-जा करणाऱ्या या दोन दुचाकीची दामोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला यात स्वप्नील ढवळे या युअवच बळी गेला असून, अन्य दोन युवक जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.