मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.डॉ.तुषार राठोड यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील गोर - गरीब, बचत गटांच्या महिलांना आपल्या गावातच स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अल्प दरात पिठाची गिरणी व शिलाई मिशन वाटप करण्यात आले.
मतदारसंघातील महिला स्वावलंबी व्हावेत व आपल्या गावातच महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा महिला आर्थिक स्वावलंबन व्हावे यासाठी मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ तुषार राठोड यांच्या संकल्पनेतून आज तालुक्यातील महिलांना अल्प दरात पिठाची गिरणी व शिलाई मिशन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यकर्माचे अध्यक्ष सौ.डॉ.शारदाताई विरभद्र हिंमगिरे तर उदघाटक मुखेड प.स सभापती सौ.साविताताई पाटील खैरकेकर, सौ.डॉ.शोभाताई उच्चेकर,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष मुखेड राजश्रीताई वसंत राठोड ,महिला आघाडी शहर अध्यक्ष मुखेड शिवरूपा ताई किन्हाळकर भाजपा , भाजपा शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, दिगांबर सोनटक्के, सुधीर चव्हाण,प्रशांत पवार आदी मान्यवर व महिला पद्धधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.