कै.शेषराव पा.बोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ७२५ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी -NNL

१०२ पिशव्या रक्त संकलन तर ७५ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड 


मुखेड, रणजित जामखेडकर।
मुखेड तालुक्यातील मौजे धनज येथील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन कै. शेषराव पा.बोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात सातशे रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यावेळी १०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली दरम्यान ५५ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून   ४५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान याच दिवशी आयोजित रक्तदान शिबिरात १०१ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहे.

मुखेड तालुक्यातील मौजे धनज येथील ज्येष्ठ नागरिक तथा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन स्व.शेषराव पा. बोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे सुपुत्र रायगडचे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर पा. बोडके व सुधाकर बोडके पा‌‌.आणि प्रल्हाद बोडके पा.यांनी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून पंचक्रोशीतील सव्वा सातशे रुग्णांची या शिबिरात तपासणी करण्यात आली .

यावेळी शंभरावर नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ५५ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून ४५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली त्यापैकी पंचवीस नेत्र रुग्णांना उदगीरला शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे .आरोग्य तपासणी शिबिरासाठी उदयगिरि नेत्र रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित होती तर अन्य तपासण्यासाठी नांदेड व मुखेड येथील तज्ञ मंडळी उपस्थित होती. पुण्यस्मरण दिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धनंज सारख्या ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता वाढलेली असतात असतानाही १०२ रक्त पिशव्यांचा संकलन करण्यात आल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली .रक्त संकलनाचे काम जिजाई ब्लड बँक नांदेड च्या टीमने केले.


कै.शेषराव बोडके पा.यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पंचक्रोशीतील हजारो चाहत्यांनी उपस्थिती लावून पुष्पांजली अर्पण करून कै.शेषराव बोडके पा.यांना अभिवादन केले. यावेळी मुखेडचे लोकप्रिय आ. डॉ. तुषार राठोड ,आ.राम पा. रातोळीकर, मा‌.आ‌‌. सुभाष साबणे ,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर, रविंद्र पा. चव्हाण,अंकुश देसाई देगावकर, माजी सभापती बळवंतराव पा. बेटमोगरेकर जि.प सदस्य दशरथराव लोहबंदे, विक्रीकर आयुक्त आबाजी पा.धामणगावकर , व्यंकटराव लोहबंदे, शिवशंकर पा. कलंबरकर,बाबू पा. धामणगावकर, शिवराज पा.मसलगेकर, नागनाथ पा.पाळेकर विठ्ठलराव इंगळे ,अंतेश्वर पा.बिल्लाळीकर ,

विवेक पा.चोंडीकर, नागनाथ पा. रिसेगावे ,संतोष पा.भगनूरकर, पतसंस्थेचे चेअरमन सुभाष हिंगोले, सुभाष पा. चोंडीकर ,यशवंतराव बोडके ,शिवाजी पा‌. इंगोले ,कल्याण पा. इंगळे ,एड.सुभाषराव इंगळे ,माधवराव पा‌ उंद्रीकर ,किरण पा. बोडके ,प्रकाश पा.सूर्यवंशी ,परमेश्वर पा. तुपदाळकर, सुरेश पा.पाळेकर, यशवंत सोनकांबळे एकलारकर, राम पा. चांडोळकर, प्रकाश पा. डोरनाळीकर, हनुमंत पा.वडजे ,गजानन पा.बोडके शिवाजी नाना बोडके उपस्थित होते.

 या शिबिरास लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर चे डॉक्टर रामप्रसाद लखोटिया आणि त्यांची सर्व टीम बाल रोग तज्ञ डॉ. रामराव श्रीरामे आणि त्यांचे तज्ञ डॉक्टर सहकारी मंडळी व जिजाई ब्लड बँकेची सर्व टीम उपस्थित होती.

प्रारंभी उपस्थित सर्व डॉक्टर मंडळी व पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा संयोजन समितीच्या वतीने संयोजक मधुकर पाटील बोडके प्रल्हाद पाटील बोडके सुधाकर पाटील बोडके यांनी  बोडके परिवाराच्या वतीने स्वागत केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पा. इंगोले तर आभार प्रल्हाद पा. बोडके यांनी मानले या कार्यक्रमास पंचक्रोशीतील बोडके परिवारावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी