नविन नांदेड। घरासमोरील मैदानावर उभे असलेले चारचाकी वाहन जाळल्याची घटना सिडकोतील वसंतराव नाईक महाविद्यालय समोरील परिसरात ५ मे रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली असून या प्रकरणी चार जणा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,सिडको येथील रहिवाशी मुकेश सर्पे यांचे आर.जे.०६ सी.४९६२ क्रमांकाचे चारचाकी वाहन आहे. सदर वाहन नेहमीप्रमाणे घरासमोरील मैदानावर उभे होेते. ५ मे रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास काही तरुणांनी वाहनाला आग लावली. या आगीत वाहनाचे अतोनात नुकसान झाले असून कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत. आग लावल्यानंतर पळ काढणारे काही तरुण सीसीटिव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाले आहेत.
त्यामुळे काही तासापुर्वी वाहनाची चावी मागितल्यानंतर देण्यास नकार दिल्याने जीप क्रमांक आर.जे.०६ सि ४९६२ वर प्रेट्रोल टाकुन आग लाऊन वाहन जाळण्यात आले असून यात सिटा, स्टेअरिंग, समोरील काच,आतिल संपुर्ण शो, स्टेपनिचे टायर,व गाडीत ठेवलेले मुळ कागदपत्रे असे जळुन खाक झाले असून एकुण १ लाख ९० हजार रुपये नुकसान झाले आहे, सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार व इतर कर्मचायांनी जळालेल्या वाहनाची पाहणी केली. या प्रकरणी मुकेश सरपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चार जणा विरूद्ध कलम ४३५,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शिंदे हे करीत आहेत,या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.