डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीत अनाठायी खर्च टाळून ज्ञानमंदिरे उभारा,प्रा.इरवंत सुर्यकार -NNL


नायगाव, दिगंबर मुदखेडे|
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ व्या जयंतीत डिजे व इतर अनाठायी खर्च टाळून ज्ञानमंदिरे उभाराने हे गरजेचे आहे असे मत प्रा.इरवंत सुर्यकार यांनी जयंतीत व्यक्त केले.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन मान्यवरांच्या हस्ते केल्या नंतर या कार्यक्रमास कुंटुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  माधव पुरी साहेब यांच्या हस्ते महामानावाच्या प्रतिमेला अभिवादन करून पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले, या प्रसंगी शाहीर साहेबराव सुर्यकार यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांची रचना सादर करून महामानावांना मानवंदना दिली. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर विचार मु. अ.व्ही. एन. नकाते, मनोहर गादेवार, सा. पो.नि.माधव पुरी , रयत सेवाभावी संस्थेचे प्रा. इरवंत सुर्यकार यांनी मांडले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा.माधव पुरी,व्ही. एन. नकाते, मनोहर गादेवार, सरपंच प्रतिनिधी भगवान देशमुख, पोलिस पाटील नीलकंठ पाटील,माजी सरपंच गंगाधर देवाले,माजी उपसरपंच जे.पी ईबितदार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता आईलवार, ग्राम पंचायत सदस्या दैवशाला नागोराव डुमणे, सदस्य लक्ष्मण सुर्यकार, मारोती जाधव, गंगाधर कुऱ्हाडे, माधव झगडे ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी आनंदा शेळके, कॉम्रेड बाबू सुर्यकार, कॉम्रेड रामदास सुर्यकार, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव(पिंटू) सुर्यकार, सटवाजी डूमणे,हणमंत सुर्यकार, अंगणवाडी कार्यकर्ते गोदावरी नव्हरे, आशा वर्कर मीरा डूमणे ,कल्पना डूमणे,जयंती मंडळाचे अध्यक्ष कपिल डुमणे, आनंदा डुमणे प्रकाश झगडे, नारायण काळेवार, सुनील डूमणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास्टर माधव पवार यांनी तर प्रस्ताविक कपिल डुमणे आभार प्रवीण सुर्यवंशी यांनी मांडले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी