मयत विक्की चव्हाण;मारेकरी कैलास बिघानिया अँड गॅंग
प्रेत हस्सापूर शिवारात फेकले
गोळीबार;डोळे फोडले;शरीरावर असंख्य घाव
नांदेड| रात्री 9 वाजेच्या सुमारास उजव्या वळण रस्त्यावर गोळीबार करून जखमीला आपल्याच चारचाकी गाडीत टाकून रस्त्यात त्या जखमींचा अत्यंत निघृण खून करून त्याचे प्रेत हस्सापूर शिवारातील रस्त्यावर टाकून मारेकरी पळून गेले.पोलिसांचे काम गुंडानी केले.पण नांदेड जिल्हा पोलीस दलाने मारेकऱ्यांमधील दोन संशयतींना रात्री 11 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.नांदेड पोलिसांनी दाखवलेली तत्परता नक्कीच प्रशंसनीय आहे.गुंडानी गुंडाचा खून केल्याचा हा प्रकार घडला आहे.तरीही गुंडगिरी पूर्ण पणे बंद करून पोलिसांनी नांदेडकरांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
काल रात्री 9 वाजेच्या सुमारास माळटेकडी परिसरातील शहराच्या उजव्या वळण रस्त्यावर एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली.त्यात दुचाकी वरील तिघे जमिनीवर पडले.तेव्हा गाडीतील माणसे खाली उतरली आणि त्यांनी विकास उर्फ विक्की रामसिंह चव्हाण नावाच्या युवकावर गोळीबार केला.विक्की चव्हाण सोबतचे दोन सहकारी गोळीबारानंतर पळून गेले.त्यानंतर हल्लेखोरांनी जखमीला आपल्या गाडीत ओढून घेतले आणि एक तासानंतर हस्सापूर शिवारात एक प्रेत सापडले.प्रेताची परिस्थिती अत्यंत वाईट होती.मारेकऱ्यांनी त्याच्या शरीरावर असंख्य घाव करून त्याच्या शरीराची चाळणी केली होती.एवढेच नव्हे तर त्याचे डोळे फोडले होते.पूर्ण पणे मृत्यू झाल्यानंतर त्याचे प्रेत हस्सापुर शिवारातील खंडेराव होळकर चौकाजवळच फेकून दिले.घडलेला प्रकार काही महिन्यांपूर्वी विक्की चव्हाणचा मीत्र नरेश ठाकूरला कैलास बिघानियाने आपल्या साथीदारांसह नवीन कौठा परिसरातील ठाकूरच्या घरात घुसून हल्ला केला होता.त्याप्रकारातूनच हा खून घडला असल्याचे बोलले जात आहे. कैलास सोबत कोण कोण होते हे अद्याप समजलेले नाही.तसे पाहिले तर पोलिसांचे काम गुंडानी केले होते. आता काही पोलिसांचा भाई असलेल्या कैलासला कोण पोलीस पकडणार हा प्रश्न उभाच आहे.
घडलेला प्रकार अगोदर अपहरण वाटत होता पण पुढे हा खुनात बदलला.कैलासच्या घरावर हल्ला झाला त्यानंतर केलासला पकडण्यात पोलिसांना आलेले अपयश आजच्या खुनाचे कारण नसणार काय? असो पण नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, दत्ताराम राठोड, उप अधीक्षक धनंजय पाटील, विमानतळाचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे,स्थानिक गुन्हा शाखेचे द्वारकादास चिखलीकर,नांदेड ग्रामीणचे प्रशांत देशपांडे,इतवाराचे साहेबराव नरवाडे,शिवाजी नगरचे आनंदा नरुटे असे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हल्लेखोरांना शोधण्यात धावपळ करू लागले. पोलीस उप अधीक्षक धनंजय पाटील यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी नांदेड ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक शेख असद यांना आपल्या पथकासह वाजेगाव पोलीस चौकी जवळ येण्यास सांगितले.तेव्हा शेख असद,पोलीस कर्मचारी वसमते,जाधव,स्वामी तेथे आले.
पाटील यांच्या नेतृत्वात हे पथक मुगट ते मुदखेड रस्त्यावर गेले तेव्हा तेथे त्यांनी झाडाआड लपलेल्या दोघांना पाहिले.त्यांची नावे मुंजाजी बालाजी धोंगडे (२०) आणि सुशील मनोहर डावखरे (20) दोघे राहणार कौठा नांदेड अशी आहेत.रात्री 3 वाजता या दोघांना विमानतळ पोलीस ठाण्यात स्वाधीन करण्यात आले आहे.धनंजय पाटील यांच्या मेहनतीने पोलिसांनी काही तासातच दोन मारेकरयांना ताब्यात घेतले आहे. अत्यंत खात्रीलायक माहितीनुसार मारेकऱ्यांनी वापरलेली चारचाकी गाडी लातूर येथून चोरलेली आहे.ती गाडी नांदेडमध्ये वेगवेगळे नोंदणी क्रमांक जोडून चालत होती पण पोलिसांच्या हे लक्षात आले नाही हे मारेकऱ्यांचे सुदैवच म्हणावे लागेल.विक्की चव्हाण ज्या दुचाकीवर होता तिच्या नोंदणीचे काय हे सुद्धा बारकाईने पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
विमानतळ पोलिसांनी मयत विक्की चव्हाणची बहीण मंजुषा रामसिंह चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून नरेश ठाकूरला केलेल्या मारहाणीचा बदला विक्की घेईल म्हणून कैलास बिघानिया आणि त्याच्या साथीदारांनी विक्कीचे गोळीमारून जखमी केले आणि त्याचा निघृण खून केला आहे.यातक्रारीत कैलास बिघानिया,सुशील डावखरे,मुंजाजी धोंगडे,प्रदीप श्रावणे.सोमेश कतथे,दिलीप डाखोरे आदींची नावे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.मंजुषा चव्हाणच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ,302,201,34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 आणि 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 252 / 2020 दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय ननवरे हे करीत आहेत.
हप्ता वसुली करणारा विक्की चव्हाण आणि त्याचा खून करून आता हप्ता वसुलीत उतरण्यास तयार होणारे या तक्रारीतील गुंड हा प्रकार नव्याने सुरु होणार आहे.मागील एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी केलेले एक वक्तव्य आठवले.त्याच प्रमाणे होणे अत्यंत गरजेचे आहे असे आज लिहावेसे वाटते.उर्वरित मारेकरी पकडून आपल्या कार्यकाळात गुंडगिरी कोणाचीही चालणार नाही हे विजयकुमार मगर यांनी दाखवलेच पाहिजे,अशी अपेक्षा जनतेतून उमटत आहे.हस्सापूर शिवारातील शेतकरी सुद्धा गुंडांच्या त्रासाला वैतागले आहेत.हस्सापूर-असर्जन हा रस्ता गुंडासाठीच बनवला आहे काय ? असा प्रश्न समोर येत आहे.सर्व सामान्य जनतेचे काय,त्यांचे रक्षण कोण करणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत.