नायगाव, दिगंबर मुदखेडे| लोककलावंत दु:ख दूर करून समाजाला आनंद देतात. पण, त्यांच्याकडे सन्मानाने पाहिले जात नाही. समाजाची नाडी ओळखणाऱ्या लोक कलांवतांचा योग्य सन्मान करण्याची गरज आहे', असे प्रतिपादन शाहीर आंबदस तावडे यांनी केले. ते शाहिरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.
शाहीर आत्माराम पाटील शाहिरी मंचच्या दशपुर्ती वर्धापन दिनानिमित्त व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच औरंगाबाद उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच औरंगाबाद बालशाहीर पुरस्कार औरंगाबाद येथील लोकशाहीर शाहीर दिगु तुमवाड यांना आंबदास तावडे व मा. संचालक. महाराष्ट्र राज्य , व आंजली धानोरकर उपाजि जि्हाधिकारी औरंगाबाद यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व शाल देउन सन्मान पुरस्कार दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 06 वाजता मराठवाडा महसूल प्रबोधनी सभाग्रह औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर राजेश कावळे निवृत्त अधीक्षक, खंडूराज गायकवाड ज्येष्ठ पत्रकार मुंबई, बाल शाहीर संचिका एळवे, यांच्यासह अनेक शाहीर बाल कलावंत बालकलाकार बाल शाहीर व अधिक मान्यवरांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र कलावंतांची कामगिरी बजावणारे अनेक कलाकारांना दिशा देणारे समजला वेगळ्या प्रकारची दिशा निर्माण करणारे लोककलावंत लोकशाहीर दिगु तुमवांड सुजलेगावकर यांचे नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील सर्व लोकं कलावंत यांच्यासह सर्व नागरिक यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. शाहीर आबासाहेब तावडे यांनी लोककलावंतांच्या योगदानावर प्रकाश टाकला. 'एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला' असे संत तुकडोजी महाराज यांनी म्हटले होते. कलानिपुण मनुष्य समाजाचे दु:ख दूर करून निर्भेळ आनंद देतो. लोककलावंतांना मिळणारा सन्मान कोणत्या प्रतीचा आहे ? कलावंताला 'लोक' प्रत्यय जोडणे म्हणजे कलावंताला संपवणे आहे. लोकगायक म्हणजे किंमतच नाही. मातीतून आलेल्या लोककलेची उपेक्षा थांबवण्याची गरज आहे', असे म्हणाले.
यावेळी लोककला प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी 'शाहिरी जागर' कार्यक्रम सादर केला. शाहीर गोकुळसिंग क्षत्रिय व बाबूसिंग राजपूत यांच्या राष्ट्रीय गणाने सुरुवात झाली. संत तुकडोजी महाराज यांचे 'जागृत व्हा तरुणांनो', 'चल उठ भारता' ही गीते सादर करण्यात आली. किशोर धारासुरे यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा आणि प्रचिती हासेगावकर यांनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा सादर केला.बालशाहीर रोहित काटे याने 'आई भवानीच्या कृपेने राजा झाला शिवराया' लोकगीत सादर रसिकांची दाद मिळवली. पुरस्कारमूर्ती बालशाहीर अमोघराज आंबी याने अण्णा भाऊ साठे लिखित 'माझी मैना' लावणी सादर केली. शाहीर अजिंक्य लिंगायत, कल्याण उगले, कृष्णा जाधव, शाहीर रामानंद जाधव, आदींनी आभिनंदन केले.