राज ठाकरे यांच्या सभेसाठी नांदेडातून हजारो कार्यकर्ते रवाना -NNL


नांदेड|
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगर येथे होणार्‍या सभेसाठी नांदेड येथून जिल्हाप्रमुख मॉन्टीसिंघ जहागिरदार व माजी जिल्हाप्रमुख विनोद पावडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते रवाना झाले.

हिंदुत्ववाच्या मुद्यावर आज औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची ऐतिहासिक सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते रवाना होत असून नांदेड येथूनही हजारो कार्यकर्ते या सभेसाठी रवाना झाले. शहरातील सिंधुताई पावडे पेट्रोल पंप येथून मनसे जिल्हाप्रमुख मॉन्टीसिंघ जहागिरदार, माजी जिल्हाप्रमुख विनोद पावडे, यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रवाना झाले. यावेळी 10 बसेस, 50 कार नांदेड येथून रवाना झाल्या तर जवळपास 1 हजार कार्यकर्ते रेल्वेने रवाना झाले.


यावेळी मनविसे जिल्हाप्रमुख दिपक स्वामी, संतोष सुनेवाड, महिला जिल्हाध्यक्ष सौ. उषा नरवाडे, वसमत तालुका प्रमुख ओम भालेराव, श्रीधर डहाळे, राम देसाई, नारायण फड, बालाजी सलगरे, संतोष जाधव, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रवि राठोड, सुभाष भंडारे, अनिकेत परदेशी, शक्ती परमार आदीसह असंख्य कार्यकर्ते रवाना झाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी