उस्माननगर, माणिक भिसे। सोशल मिडियावर हातात एअर पिस्तूल आसलेली व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या उस्माननगर येथील २५ वर्षीय युवका विरुद्ध येथील पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम नुसार ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उस्माननगर येथील २५ वर्षीय कैलास बाबुराव बोरगे हा २१ मे ला सोशल मिडियावर एअर पिस्तूल सह व्हिडीओ पोस्ट केलेचे आढळून आल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे ,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डी.ए.देवकते, पीएसआय पल्लेवाड ,पोका.अनिरुध्द वाडे यांनी कैलास बोगरे यांच्या ताब्यातील एअर पिस्तोल जप्त करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्वीच्या काळी बाजारात विकण्यासाठी येत होते. मात्र ते नकली आहे की असली आहे,. कोणालाच समजत नसे. नागरिक आपल्या मुलांना आवडीने विकत घेत असे, धुलीवंदन साठी लहान व तरुण मंडळी रंग भरण्यासाठी वापरले जात असे तर दिवाळीला उडवण्यासाठी पिस्तूल वापरली जात होती परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये खरोखरच पिस्तोलीचे धारकरी दिसून येत आहेत. नांदेड शहरामध्ये सध्या अन्य अन्य गोष्टींमधून आपणाला दिसून येत असतानाच ग्रामीण भागातून सुद्धा युवकाकडून पिस्तुल हस्तगत केल्याची घटना घडल्याने चर्चेचा विषय बनला आहे, एकूणच सोशल मिडिरावर पोस्ट करणे महागात पडले.