हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिरात वारकरी संप्रदाय परिषदेच्या वतीने आयॊजीत बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात चिमुकल्या बालकांना वारकरी संप्रदायाचे धडे देण्यात आले. तसेच गेल्या १७ तारखे पासुन रात्री ठिक ७ ते ९ ह्या वेळात भागवताचार्य ह भ प प्रविण महाराज पार्डीकर यांच्या मधुर वाणीतून कृष्ण कथा सुद्धा पार पडली आहे.
धर्माचे पालन करणे, पाखंड खंडण हेची करणे आम्हा काम, बिज वाढवावया नाम.. या ओवींना अनुसरून आज कलीयुच्या पर्वामध्ये बाल पिडी हि सुसंस्कारा पासुन वंचित राहात आहेत. आणि तरूण पिढी व्यसनाच्या आधीन होत आहे. ह्या सर्व बाबिंचा विचार करूण मोफत बाल सुसंस्कार शिबिर दि.१७ पासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात ठेवण्यात आले होते. या शिबिरात बर्याच पालकांनी हृया ठिकाणी आपले पाल्याना पाठवून धार्मिकतेचे धडे देण्यासाठी पाठविले होते. या शिबिरात खेळाबरोबर बाळा वयात आवश्यक त्या गोष्टीचे मार्गदर्शन सुसंस्कार आणि हिंदू संस्कृतीचे दर्शन घडले. शिबिराचा समारोप दि. २१ तारखेला सकाळी १० ते १२ या वेळात काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला.
यावेळी किर्तनकार हभप. राम महाराज पांगरीकर यांनी आपल्या मधुर वनितावुन भागवण श्रीकृष्णची लीला, खोड्या आणि खेळ याबाबदल सखोल माहिती देऊन चिमुकल्यांचे बालवयात कसे वागावे याबाबदार मार्गदर्शन केले. आणि भगवान परमात्मा श्रीकृष्णाच्या पाऊणलावर पाऊले ठेऊन आई वडिलांचा मित्रासोबतची मैत्रीचे वर्णन करून शेवटी दहीहंडी फोडण्यात आली. कळायच्या किरातांचा प्रसाद वितरनानानंतर बालसुसंस्कार शिबिराचा समरावप झाला. शिबिर संचालक विश्वंभर महाराज कदम, आळंदिकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजक प्रविण महाराज पार्डीकर, भागवताचार्य तथा राष्ट्रीय वारकरी परिषद ता अध्यक्ष हिमायतनगर यांनी केले होते. शिबिरात उपस्थित झालेल्या सर्व बालकांना अन्नदानाचे कार्य परमेश्वर मांडीत ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.शिबिरात मोठ्या प्रमाणात चिमुकल्या बालकांनी उपस्थिती लावून शिबीर यशस्वी केले.