हिमायतनगर/भोकर। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात ३० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यान्वित असून नांदेड जिल्हयातील आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी किनवट स्थित हे कार्यालय आहे. प्रकल्प क्षेत्रातील विविध योजनांची प्रभावी नियोजन व अंमलबजावणी होण्यासाठी प्रकल्प स्तरीय नियोजन व आढावा समिती विहित असून शासनाने अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे.
अध्यक्षपदी किनवट येथील ॲड. प्रकाश गेडाम यांची तर अशासकीय सदस्यपदी शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व तथा वाळकेवाडी- दुधडचे उपसरपंच संजय माझळकर यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून भोकरचे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर वानोळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बालाजी कराळे, पत्रकार शंकर बरडे, तुकाराम खोकले, रामराव कोठूळे, कोंडीबा झाडे, बाबुराव वानोळे, सुभाष वानोळे यांनी प्रकल्प स्तरीय नियोजन- आढावा समितीचे सदस्य संजय माझळकर यांचा दि.२२ मे रोजी वाळकेवाडी येथील शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सहृदय सत्कार केला.
सत्कार समारंभ प्रसंगी रामदास खोकले, ज्ञानेश्वर वानोळे, साईनाथ खोकले, मारोती खोकले, मंगेश वानोळे, दत्ता कोठूळे, संदीप कोठूळे, अविनाश कराळे, गणेश झाडे, पंडित झाडे, संभाजी वानोळे, राजू झाडे, सतीश वानोळे, काशिनाथ खोकले, बालाजी खोकले यांच्यासह भोकर हिमायतनगर, हदगाव, किनवट,माहूर तालुक्यातील अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.