परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा सर्वांनी आचरणात आणावी ! - पू. शिवनारायण सेन -NNL

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ईश्‍वरी कार्य !’ या विषयावर विशेष संवाद !


मुंबई|
गेल्या 800 वर्षांपासून मौलवी, मिशनरी तथा मार्क्सवादी यांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. देशात 100 कोटींहून अधिक हिंदू असून सुद्धा या देशात हिंदूंच्या विरोधात लपून छपून कायदे केले गेले. अशा काळात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी 'भारत हे हिंदु राष्ट्र झाले पाहिजे' असा संकल्प सर्वांसमोर मांडला. तेव्हा आम्हाला आश्‍चर्य आणि असंभव वाटत होते; मात्र रामजन्भूमीचे निर्माण, काशी विश्‍वनाथ मंदिरासाठी लढा यांसह अनेक घटना पाहता आता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने हिंदु कृतीशील होत आहेत. 

आता मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना सत्यात उतरतांना दिसत आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची जी दिशा दिली आहे, त्यानुसार सर्वांनी आचरण केले पाहिजे, असे आवाहन पश्‍चिम बंगाल येथील 'शास्त्र धर्म प्रचार सभे'चे सचिव पू. शिवनारायण सेन यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित 'परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ईश्‍वरी कार्य !' या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

यावेळी अनुभवकथन करतांना 'पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.'चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले की, आधी मी विविध हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनेसह कार्य करत होतो, तसेच अध्यात्मावरील ग्रंथांचे वाचन करत होतो; मात्र ज्या वेळी सनातनच्या संपर्कात आलो. तेव्हा संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्माचे वैज्ञानिक भाषेत केलेले विवेचन भावले. पुढे साधना केल्यावर मला खर्‍या अर्थाने आनंद आणि समाधान मिळाले. जो आधी कुठेही मिळाला नव्हता.

यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले की, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने सनातन संस्थेची स्थापना करून हजारो लोकांना साधनेला लावले. तसेच अध्यात्माचा शास्त्रीय भाषेत प्रचार केला. पुढे विश्‍वकल्याणासाठी ईश्‍वरी राज्य अर्थात् हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, म्हणून देशभरात हिंदु राष्ट्र जागृती सभांचे आयोजन करून हिंदु राष्ट्राच्या कार्याला गती दिली. देशभरात हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग चालू केले. हिंदूंना धर्मकार्यासाठी संघटित केले. यासाठी परात्पर डॉ. आठवले यांनी वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म, साधना, आचारधर्म, आयुर्वेद, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवर 354 ग्रंथांच्या 17 भाषांत 88 लाख 84 हजार प्रती प्रकाशित केल्या आहेत. आज हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ देण्याचे कार्य सनातन संस्था करत आहेत.

कोल्हापूर येथील शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव म्हणाले की, छत्रपति शिवाजी महाराज यांनी स्वतः साधना केली आणि मावळ्यांना सिद्ध करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपण सुद्धा साधनेच्या बळावर हिंदु राष्ट्र आणू शकतो, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले. आज हिंदु राष्ट्राचा विषय सर्वत्र चर्चेत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण मार्गक्रमण करत आहोत.

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 99879 66666)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी