नांदेड। उत्तराखंडच्या देवभूमीत प्रसिद्ध असलेल्या बद्रिकेदार , गंगोत्री, यमुनोत्री या चारधाम यात्रेला जाण्यासाठी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नांदेड येथून ४५ जणांचा जत्था सचखंड एक्सप्रेस ने दिल्लीकडे रवाना झाला असून त्यांना ढोल ताशाच्या गजरात नांदेडकरांनी शुभेच्छा दिल्या.
२० मे ते ३ जून या कालावधीसाठी जाणाऱ्यामध्ये ३९ यात्रेकरु व ६ केटरिंग टीमचे सदस्य यांचा समावेश आहे. मुखेडच्या बेटमोगरेकर परिवार व नायगावच्या चव्हाण परिवारातील २० महिला सह एकूण ३० भगिनी सहभागी झाल्या आहेत. सुरुवातीला हरिद्वार, ऋषिकेश, यमुनोत्री त्यानंतर केदारनाथ, बद्रीनाथ व गंगोत्री चे दर्शन ही मंडळी घेणार आहेत. खडतर अशी चारधाम यात्रा सुखकर व्हावी यासाठी दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यापासून दररोज गोवर्धन घाटच्या श्रीराम सेतु पुलावर सहा किलोमीटर पायी चालण्याचा सराव करण्यात आला आहे. याशिवाय ॲड. चिरंजीलाल दागडिया यांच्या
गार्डन मध्ये प्राणायामाचे वर्ग नियमित घेण्यात आले. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी उपजिल्हाधिकारी विकास माने, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिप सभापती संजय बेळगे, नगरसेवक आनंद चव्हाण, प्रतिष्ठित व्यापारी सतीश सुगनचंदजी शर्मा, ॲड. दागडिया, स्नेहलता जैस्वाल, पवनसिंह बैस, माधवराव शेळगावकर, बळवंतराव बेटमोगरेकर, हनुमंतराव पोमदे, विजय चव्हाण, डी. एस. पवार, संजय शेळगावकर, श्रीनिवास चव्हाण, डॉ. विश्वास चव्हाण, साहेबराव पाटील गोलेगावकर, राजेशसिंह ठाकुर, अशोक सराफ, सुधीर विष्णुपुरीकर,सुभाष शिंदे, धोंडोपंत पोपशेठवार, संजय बेटमोगरेकर
यांच्यासह अनेक जण रेल्वे स्थानकावर आले होते. ही यात्रा काढण्यासाठी विजय बेटमोगरेकर ,अभिजीत बेटमोगरेकर, कुमार अभंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. ढोल-ताशांच्या गजरात सर्व यात्रेकरूं चा शाल, मोत्याची माळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. बम बम भोले, हर हर महादेव या घोषणा नी सारे वातावरण उत्साहीत झाले होते. परभणी येथे पूजा व धनराजसिंग ठाकूर यांनी यात्रेकरूंचे स्वागत केले. जालन्याला सुप्रिया व रितेशसिंह चौहान यांनी सर्वांसाठी हातरुमाल आणले. संभाजीनगरला बालाजी सोनटक्के व वाल्मीक पवार या अमरनाथ यात्रेकरूंना सर्वांचा सत्कार केला.
कोरोनामुळे दोन वर्ष चारो धाम यात्रा बंद असल्यामुळे यावर्षी यात्रेला उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. केदारनाथ येथील दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी मनपा स्थायी समिती सदस्य किशोर स्वामी हे प्रयत्न करत आहेत. यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या नातेवाईकांना मित्रांना व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे संयोजक दिलीप ठाकूर यांनी आभार मानले.