तय बाजारीची नियमबाह्य वसुली संबंधीत गुत्तेदाराचा ठेका रद्द करण्याची नगरसेविका वैशाली देशमुख यांची मागणी -NNL


नांदेड|
तय बाजारीची नियमबाह्य वसुली करुन मोठ्या प्रमाणात अपहार, भ्रष्टाचार करण्यात येत असून संबंधीत गुत्तेदाराचा ठेका रद्द करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मा.स्थायी समिती सदस्या तथा नगरसेविका सौ. वैशाली देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुकतांकडे केली आहे.

नांदेड शहर महानगरपालिकेच्या वतीने दैनंनिदन भाडे वसुलीचा मक्ता दि. 15 जुन 2021 पासून छत्रपती शिवाजी स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यां. नांदेड यांना दिलेला आहे. तय बाजारी वसुलीसाठी नियम, अटी शर्ती नुसार करारनामा केलेला असतांना संबंधीत गुत्तेदार मनमानी पद्धतीने 30 रु 40रु 50रु असे पाच पट नियम बाह्य वसुली करत आहे. 

करारनाम्यातील अटींचा भंग करत नियमामाह्य वसुली करण्यात येत असून संबंधीत गुत्तेदाराकडून नियम बाह्य वसूल केलेली रक्कम वसुल करावी, त्यांचा ठेका रद्द करावा तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच वर्तमानपत्र मध्ये जाहीर प्रगटन देऊन दर निश्चित आहेत ते छापून व्यापारी माहिती द्यावी अशी मागणी नगरसेविका सौ. वैशालीताई देशमुख यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी