बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक करणाऱ्या पोलीस पाटलाची 12 मे रोजी सुनावणी लावल्यामुळे कॉ. आनंदा पवार यांचे उपोषण स्थगित -NNL


नांदेड|
मौजे काकांडी येथील सिटू कामगार संघटनेचे सदस्य कॉ.आनंदा कोंडीबा पवार वय 68 वर्षे यांनी दिनांक 9 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले होते. काकांडी तर्फे तुप्पा येथील माजी पोलिस पाटील श्री माधव व्यंकोबा बागल यांनी बनावट कागदपत्रे सादर करून पोलीस पाटील पदाची नोकरी मिळवली व खोटे कागदपत्रे सादर करून वय पूर्ण झाले असताना देखील वयाच्या 72 व्या वर्षापर्यंत नोकरी केली आहे. या संदर्भाने उपोषणार्थि कॉ.आनंदा पवार यांनी दिनांक 28 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज करून पुरावे सादर केले होते व योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.

तेव्हा दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपविभागीय अधिकारी नांदेड यांना पत्र काढून चौकशी करून कारवाई करण्याची सूचना देण्यात आली होती परंतु दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी तक्रारदार कॉ.आनंदा पवार यांनी लेखी पत्र देऊन संबंधित पोलीस पाटील श्री माधव बागल हे मानधन तत्त्वावर कार्यरत होते व ते दिनांक 16 /3 /2018 रोजी पोलीस पाटील पदावरून निवृत्त झाले आहेत. म्हणून सद्यस्थितीत या कार्यालयाकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येत नाही.

तेव्हा दिनांक 9 मे पासून ज्येष्ठ नागरिक उपोषणार्थी अखंड तीन दिवस अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले असता आणि ते सिटू कामगार संघटनेचे सभासद असल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड गंगाधर गायकवाड व कॉ.मारुती केंद्रे यांच्या स्वाक्षरीने दि 11 मे रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उपोषनार्थिच्या मागण्या संदर्भात तातडीने योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या पत्राची दखल जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी तात्काळ घेतली असून उपविभागीय अधिकारी नांदेड व त्यांचे सहकारी पिंटॊ सपकाळे उपोषणस्थळी येऊन दिनांक 12  मे रोज गुरुवारी उपविभागीय अधिकारी नांदेड कार्यालयात सुनावणी घेणार असल्याचे लेखी पत्र उपोषणार्थिना दिले.

सादर केलेले पुरावे पडताळणी करून निवेदनातील मागण्या प्रमाणे कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्या लेखी आश्वासन याप्रमाणे कॉ.आनंदा पवार यांचे उपोषण उठले असून त्या उपोषणास ऍड. एम.जी. बादलगावकर, ॲड डी.एन.भालेराव, ऍड. दीपिका गहलोत, बबन गडपाले, संजय पंडित, प्रदीप लक्ष्मणराव वाघमारे, पत्रकार विनायक कामटेकर, नबी खान रहेमखान, ईरेली गंगाराम, माणिकराव गायकवाड, ऍड. जी.एस. गेहलोत, ऍड, जी.वी.पावडे, अमोल काळे,संजय राक्षेसे काकांडीकर,अशोक राज कांबळे आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी स्वरुपात पाठिंबा दिला आहे. तातडीने सुनावणी घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांचे आभार मानले आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी