उस्माननगर, माणिक भिसे। लोहा-कंधार मतदार संघामधील जि.प.व पं.स.गटात सगळ्याच राजकीय क्षेत्रातील पुढार्यांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी साखरपुड्या पासून ते लग्नकार्या पर्यंत छोट्या-मोठ्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भेटीगाठी वर जोर लावल्याने मतदारराजा विकासाच काय? असा प्रश्न उपस्थित करीत आहे. या विषयावर विकासावर कोणीही बोलायला तयार नाही.
लोहा-कंधार मतदार संघाला दोन खासदार व दोन आमदार जि.प.सदस्य ,असून विकासमात्र काहीच नाही. बोटावर मोजण्याइतके ग्रामीण भागातील रस्ते सोडले तर शहरासह तालुक्यातील रस्त्याची दयनी अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळने अवघड झाले आहे. तालुक्यातील व शहरातली पाणी, वीज, मुख्य रस्ते असे अनेक कामे तसेच आहेत. भेटीगाठीमध्ये फक्त निवडणुकीची, आरक्षणाची, कोण-कोण थांबणार आहेत याशिवाय दुसरी चर्चाच नाही.
लोकप्रतिनिधी नांदेडवाशी झाले असल्यामुळे कार्यकर्त्यांसह सामान्य माणसाला दर्शन दुर्मिळ झाले आहे. विकास तर दूरच राहिला कोणाला भेटायला जायचे असेल तर सकाळी आठ वाजता खासदार व आमदार कार्यालय गाठावे लागते. थोडा उशीर झाला तर जाणे व्यर्थ ठरत आहे. लातूरच्या खासदाराचे तर दर्शन चातक पक्षासारखे झाले आहे. विकास कामतर सोडाच त्यांच्या मतदारसंघातील लोकांना आपले खासदार कोण आहेत हेच माहित नाही.
विद्यमान खासदाराला तीन वर्षात एकही कार्यकर्ता बनवता आला नाही. विकासाची मोठी स्वप्न दाखवून मोदी लाटेमध्ये हे सरकार जनतेचे काय तरी चांगले करील असे वाटले. परंतु कंधार तालुक्यातील शिराढोण जिल्हा परिषद सर्कल मधील मतदारांनी पहिले पाच वर्ष सुनील गायकवाड यांना निवडून दिले. 2019 च्या निवडणुकीत पक्षाने नवीन चेहरा म्हणून सुधाकरराव शृंगारे यांना उमेदवारी दिली. पण यांचे काम तर चातक पक्षाच्याही वर निघाले.
कंधार पं.स.व जि. परिषदेची मुदत संपून आता प्रशासकीय राज आले आहे. जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची नगरपरिषद मानली जाते. 2016 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे शिवसेनेत होते. त्यांनी मोर्चेबांधणी करत काँग्रेसचे नेते अरविंद नळगे यांना आव्हान दिले होते. तर ॲड मुक्तेश्वर धोंडगे यांच्या नेत्रुत्वात भाजप देखील मैदानात उतरली होती. अटीतटीच्या या लढतीत काँग्रेसच्या अरविंद नळगे यांच्यावर मतदारानी विजय दाखवला.
त्यांच्या पत्नी सौ शोभाताई नळगे या अध्यक्ष झाल्या. या निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी काँग्रेसचे 5 नगरसेवक निवडून आले. चिखलीकर गटाचे 10 तर 2 अपक्ष निवडून आले. त्यामुळे अध्यक्ष एका पक्षाचा आणि बहुमत दुसऱ्या पक्षाला असे चित्र उभे राहिले. त्रिशंकू स्थितीमुळे शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. अध्यक्ष पदासाठी न्यायालयीन वाद, नगरसेवकांत समन्वयाचा अभाव, कुरघोडीचे राजकारण, हेवेदावे अधिक दिसून आले. परिणामी शहराचा विकास रखडला.
शिराढोण जि.प.सर्कल मध्ये खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विश्र्वासावर विश्र्वास ठेवून रावसाहेब शिंदे,सौ.कुशावर्ताबाई माधवराव भिसे, यांना निवडून दिले.त्यानंतर प्रविणपाटील चिखलीकर यांना निवडून दिले.सर्वांना परिचित असलेले व गोरगरिबांच्या मदतीना धावून जाणाऱ्या पांडागळे कुटुंबातील बालाजी पांडागळे यांचा पराभूत झाला.मतदाराना वाटलं या भागातील रखडलेले कामे लवकर होतील वाटल पण विकासासाठी आवश्यक निधी नसल्याची चर्चा तयार करून मतदारांना थंड ठेवलं.
नुकत्याच तिन वर्षांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत खा.चिखलीकर यांनी संपूर्ण ताकद शामसुंदर शिंदे यांच्या बाजूने लावून त्यांना निवडून आनले.त्यांनी जनसंपर्क वाढवून स्वताहाची ताकद तयार केली.शिराढोण सर्कल विकासापासून वंचित आहे.आजही उस्माननगर वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी दुसऱ्याकडे हात पसरावा लागत आहे.गावातील महत्त्वाच्या रस्त्यावर पावसाळ्यात चालताना कसरत करावी लागते आहे.
राज्यमार्ग व राष्ट्रीय मार्ग अगदी शहराच्या जवळून गेला. पण कोणत्याही लोकप्रतिनिधींनी हा मार्ग कंधार शहरातून वळविला नाही. या राष्ट्रीय मार्गावर आलेले सर्कल, गावे तालुक्यापेक्षा जास्त विकसित झाले आहेत. पाच वर्षात लोकप्रतिनिधीचा नुसते भूमिपूजन करण्यावर सपाटा चालू आहे. विकास मात्र कागदावरच दिसत आहे. मतदारसंघातील नागरिकांनी तर राजकीय पुढाऱ्यांकडून अपेक्षा करणे सोडूनच दिले आहे. राजकीय पुढारी ही विकास कामे तर सोडाच नुसत्या भेटीगाठी आणि कार्यक्रमाला हजरी लावणे या मध्येच व्यस्त दिसून येत आहेत. आता होणाऱ्या निवडणूकि मध्ये कोणत्या विकास मुद्यावर राजकीय पुढारी बोलतील याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. हा येणारा काळच सांगेल.