हदगाव, शे चांदपाशा| प्रेषित हजरत मोहम्मद पैंगबर यांनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे. एकत्ता व विश्वबंधुत्वचा शिकवण देणारा हा पविञ महीना रमजानाचा आहे. मुस्लिम समाज बाधवांनी रमजान उत्सव आनदाने साजरा करावा असे अहवान विधानसभा क्षेत्राचे आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे.
हदगाव शहरात रविवारी शहरातील मौलना आझाद शादीखाना मध्ये काँग्रेस पक्षातर्फै उपवासधारकांना इफ्तार पार्टी देण्यात आली होती. यावेळी हदगाव नगरपरिषदेचे उपध्याक्ष सुनिल भाऊ सोनुले, काँग्रेस शहर अध्यक्ष खदीरखान, गटनेते अमित आरसुल, माजी नपा. सदस्य फिरोज पठाण, विनोद राठोड, आनंद काबळे आमदारांचे शहरातील जनसंपर्क कार्यालयीन व्यवस्थापक कृष्णा पवार आदी हजर होते...
पोलिस दलाची अनुपस्थिती जाणवली.....! मागील दोन वर्षाचा कोरोनाचा काळ वगळता या पुर्वी सामाजिक दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत पोलिस दलाचे पोलिस निरक्षक तथा पोलिसाचे वरिष्ठ अधिकारी पोलिस कर्मचारी इफ्तार पार्टीत सहभागी व्हायचे. माञ यावर्षी माञ पोलिस दला कडुन इफ्तार पार्टीत दिसुन आले नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल...!