नांदेड| शैक्षणिक वैभवामध्ये भर टाकण्यासाठी सुरु होत असलेली देशातील मनांकित अशी आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रसार संस्था व सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त असलेली "माऊंट लिटेरा झी" स्कूल विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या उद्देशाने आपल्या पाल्याच्या शैक्षणिक वाटचालीसाठी नांदेड नगरी सज्ज झालेली आहे.
दिनांक एक मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नांदेड शहरामध्ये देशात सर्व राज्यांमध्ये कार्यरत असलेली झी स्कूल विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने व सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या प्रसंगी ओपन टू ऑल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध नामांकित शाळेतील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनीं आपला सहभाग नोंदवला. वर्ग नर्सरी, एलकेजी , युकेजी पासून सातव्या वर्गापर्यंत आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये इयतेमधून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊंट लिटेरा झी स्कूलच्या अध्यक्षा, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती भारतीबाई पवार, संचालक श्री सचिन पवार, संचालिका सौ. मीनाक्षी पवार मॅडम, मार्गदर्शक श्री गणेश पवार, प्रोजेक्ट मॅनेजर विपिन शर्मा सर दिल्ली, प्राचार्य सौ. रमिंदर कौैर मोदी, श्री हर्षवर्धन सर, प्रवीण सर, भास्कर सर, जगदंबे सर, लीना मॅडम, निकिता मॅडम, निर्मला मॅडम, प्रतिभा मॅडम, माधुरी मॅडम, प्रांजली मॅडम आदी शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर सर यांनी केले. पालकांनी या नवीन संकल्पना असलेल्या माउंट लिटेरा झी शाळेच्या उपक्रमांविषयी भर भरून कौतुक केले.
.......