नविन नांदेड। स्वाभिमानी नेते अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त व ईद मिलनाचा निमित्ताने वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणचा वतीने प्रकाश पर्व महामानवाच्या विचारांचा जागर महोत्सव अंतर्गत झी युवा संगीत सम्राट फेम अजय देहाडे यांच्या काळजावर कोरले नांव भिमा कोरेगाव या गितास ऊपसिथीत जनसमुदाय यांनी टाळ्यांचा व जयभिम घोषणा करत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील नागरीक व महिला यांच्यी उपस्थिती होती. नांदेड दक्षिण वंचित बहुजन समाज आघाडीच्या वतीने अजय दहाडे यांच्या प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन 20मे रोजी सायंकाळी ८ वाजता जेतवन बुद्ध विहार मैदान गुरूवार बाजार सिडको येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष डोगंरे व भंदते संघप्रिय यांनी केले,या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश प्रवक्ते फारूक अहेमद, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, नागोराव पांचाळ, डॉ. संघरतत्न कुरहे ,पि.एम.वाघमारे,शाम कांबळे,दैवशाला पांचाळ,निरंजनताई आवटे,आयुब खान, विनायक गजभारे, कैलास वाघमारे,चंद्रकलाताई चापलकर, जयप्रकाश लांडगे, राहुल सोनसळे ,प्रा.मधुकर गायकवाड यांच्यासह सामाजिक व पत्रकार व मान्यवरांची ऊपसिथीती होती.
या वेळी प्रांरभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर अजय देहाडे,फारूक अहेमद, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मान्यवर व पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला झि युवा संगीत सम्राट फेम ,काळजावर कोरले नांव आमच्या भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावर , प्रबोधनात्मक विविध भिम गितांचा माध्यमातून प्रबोधन करून जुन्या व नविन गिते सादर केली,या वेळी उपस्थित जनसमुदाय यांनी टाळ्यांचा कडाक्यात साथ दिली, कार्यक्रमाचे आयोजन तथा महानगर दक्षिण अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, संयोजन समिती कार्याध्यक्ष सुदर्शन कांचनगिरे, स्वागत अध्यक्ष म्हणून श्याम नायगावे तर संयोजन समितीचे अध्यक्ष अमृत नंरगलकर, साहेबराव भंडारे,गोपालसिगं टाक, पि.डी.झडते, केशव सदावर्ते,विकास धोत्रे, नंदकुमार गच्चे ,वैभव लषकरे,शामराव काशिकर,रवि चिते,माधव देवकांबळे, व सुधदोदन काशिकर व आयोजक समिती पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यक्रमा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले,या वेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.