नांदेड| लॉयन्स क्लब नांदेड एंजेल च्या वतीने सोमवारी वजिराबाद येथे छत्री व तिरंगा झेंडा वाटप करण्यात आले.
यावेळी रिझन चेअर पर्सन योगेश कुमार किशनलाल जायस्वाल, झोन चेअर पर्सन डॉ. मोतीलाल जांगिड, ममता व्यास व मुख्य अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने हे उपस्थीत होते व त्यांच्या हस्ते हर घर तिरंगा या संकल्पनेतून सर्व भाजी विक्रेत्यांना व वजिराबाद येथील दुकानदारास तिरंगा झेंडा व छत्रीचे ही वाटप करण्यात आले.
यावेळी लॉयन्स क्लब नांदेड एंजेल चे अध्यक्ष - सुरभी माहेश्वरी, सचिव - मिली मोदी, कोषाध्यक्ष - ॲड.आरती भुतडा व तसेच पारुल जैन, सुनिता जैन, अर्चना भक्कड, निलम कासलीवाल, पल्लवी काला, किरण काकाणी, पुनिता रावत हे सदस्य उपस्थित होते.