लोहा। लोह्याचे भूमिपुत्र व माजी सरपंच कै यशवंतराव चव्हाण यांचे नातू अमोल बालाजीराव चव्हाण हे जालना येथील महाराष्ट्र ग्रामीण बैंकमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावर रुजू झाले आहे.
जुन्या लोह्यातील शिवछत्रपती विद्यालयात अमोल याचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. लहान असताना त्याची मातृछत्र हरवले. वडील बी वाय चव्हाण हे मुख्याध्यापक आहेत. थोरला भाऊ सुजित हा पोस्ट ऑफिस मध्ये तर अमोल हा महाराष्ट्र ग्रामीण बैंकमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नुकताच रुजू झाला आहे.या दोन्ही भावांना त्यांची आई कावेरीबाई व वडील बी वाय चव्हाण यांनी घडविले.
नव्या पिढीतले कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कल्पक दृष्टी असलेल्या या भूमिपुत्रांनी स्पर्धा परीक्षेत हे यश संपादन केले.सरस्वती शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, नगरसेवक संभाजी चव्हाण यांचे अमोल हा पुतण्या आहे. हलदव चव्हाण कुटुंबीयात तिसरी पिढी शैक्षणिक क्षेत्रात विविध विद्या शाखेत शिक्षण घेत आहेत. अमोल याच्या यशाबद्दल देवीदास चव्हाण, भानुदास पाटील, शिवाजी चव्हाण, आनंद चव्हाण, पतसंस्थेचे सचिव रवी चव्हाण, विठ्ठल चव्हाण, महेश चव्हाण, प्रा हिलाल , त्याचे मामा हळदवचे माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे , हरी पाटील शिंदे तसेच मित्रपरिवार, गुरुजन आप्तस्वकीय यांनी अभिनंदन केले आहे.