मुखेड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला ११ जणांना चावा -NNL

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्ताकडे मुखेड नगरपरिषदेचे असभ्य दुर्लक्ष ...

पिसाळलेल्या कुत्र्याने दोन तासात शहरातील ११ जणांचा घेतला चावा


मुखेड,रणजित जामखेडकर।
शहरात दि.५ मे रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दर्म्यान बाऱ्हाळी नाका ते  कोर्टा पर्यंत पिसाळलेल्या कुत्र्याने २ तासात ११ नागरीकांना चावा घेतला आहे. जखमींना शहरातील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमीक लस देण्यात आली. पुढील उपचारासाठी सर्वांना नांदेड येथे लस देण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहीती उपजिल्हा रूग्णालयातील जनरल सर्जन गोपाळ शिंदे यांनी दिली आहे.

सायंकाळी या कुत्र्याने शहरात ११ जणांना चावा घेतला आहे. उपजिल्हा रग्णालयात कुत्र्याने चावा घेतल्यास रेबीज न होण्यासाठी दिली जाणारी 'राबीपूर' ही लस उपलब्ध आहे. मात्र, पिसाळलेले कुत्रे चावल्यास 'इमिनो ग्लोबलिंग' ही लस घ्यावी लागते. ही येथील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने चावा घेतलेल्या सर्व जखमींना नांदेड येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

 यात शिवराज लक्ष्मण कांबळे वय ४० वर्ष मुखेड, संजय धोंडीबा एकाळे वय ३५. वर्ष उमरदरी, उद्धव न्यानोबा तेलंगे वय ४० वर्षे कोटग्याळ, श्रीकांत रवी चौधरी वय १० वर्ष मुखेड, अनुसया मसनाजी निमलवाड वय ५० वर्ष धामणगाव, सय्यद अनवर जीलानी वय २६ वर्षे मुखेड, साबेर जावेद शेख वय २४ वर्ष मुखेड, शिवाजी दिगंबर गायकवाड वय ४२ वर्ष मुखेड, धर्माजी गायकवाड वय ३६ वर्षे तांदळी, गंगाधर माधवराव लुट्टे वय ३५ वर्ष होकर्णा, आयुब मिरासाब शेख वय ४५ वर्ष मुखेड. यांना पिसालेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांनी धसका घेतला आहे. नगरपरिषदने या पिसाळलेल्या कुत्र्यांसह शहरातील अन्य मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी ताबडतोब उपाय योजना करुन बंदोबस्त करावा अशी मागणी मुखेड शहरातील नागरिकांमधुन होत आहे .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी