औरंगाबाद/परभणी। महाराष्ट्र राज्यात यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस पडुन शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविला आहे.
दरवर्षी 3 मार्चला दिला जाणार पंजाब डख यांचा हवामानाचा अंदाज आत्तापर्यंत खरा ठरत आला असुन, यावर्षी म्हणजे 2022 ला थोडा उशीरा अंदाज देत मुबलक पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्यात जून महिन्याच्या सुरुवातिलाच पाऊस सुरु होणार असुन, त्यानंतर राज्यात पुर्ण पावसाळाभर समाधानकारक पाऊस पडणार आहे.
जुन महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडुन लागलीच अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील तर उर्वरित शेतकऱ्यांच्या पेरणी जुलैमध्ये पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले आहे. तर, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात वर्षातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तरी शेतकरी बांधवांनी योग्य तयारी करून खरीप हंगामाचे नियोजन करावे.
असे आवाहन हवामान तज्ञ पंजाब डख यांनी केले असून, पाऊस चालू होण्याच्या पूर्वीच शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता करून ठेवावी, जेने करून योग्य वेळी पेरणीचे नियोजन करता येईल असेही त्यांनी सांगितले आहे.