तालुक्यातील बेरळी.बु येथे जि.प.प्रा. शाळेला इंगोले कुटुंबाकडून एक लक्ष रूपयाचा धनादेश
मुखेड, रणजित जामखेडकर। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रोत्साहन मिळावे यासाठी माजी उपप्राचार्य प्रा.सुधाकरराव इंगोले, डॉ. किशनराव इंगोले पा.बेळीकर यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ बेरळी (बु) येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांना दर वर्षी स्कॉलरशिप वाटप सुरू करण्याचा संकल्प केला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे या त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे .
ग्रामीण भागातील गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासाला चालना मिळावी व कलागुणांना वाव ,प्रोत्साहन मिळावे यासाठी बेरळी येथील रहिवासी प्रा. सुधाकरराव तानाजीराव इंगोले, डॉ. किशनराव तानाजीराव इंगोले या बंधूंनी आपल्या आई वडील कै.तानाजीराव इंगोले पा व कै.जयाबाई तानाजीराव इंगोले यांच्या स्मरणार्थ बेरळी (बु) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पहिली पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जयाताना स्मृती स्कॉलरशिप ची सुरुवात केली असून या स्कॉलरशिप मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह देण्यात आले या शाळेसाठी प्राध्यापक सुधाकर इंगोले व डॉक्टर किशनराव इंगोले यांनी रोख एक लाख रुपयांचा धनादेश शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दिला आहे दरम्यान जया ताना स्मृती स्कॉलरशिप चा शुभारंभ मुखेड जेष्ठ डॉ.एम.जे. इंगोले, डॉ.आर. जी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिली ते सातवी मध्ये प्रथम आलेल्या सात विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह देण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका सौ, वसमते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ, राणी जुने, प्रा.सुधाकरराव इंगोले, सरपंच सत्यभामाबाई जुने, किसन इंगोले, ग्रामसेवक श्रृंगारे, उपसरपंच गणेश पा. बेळीकर ,नागनाथ पा.बेळीकर , सुरेश पा. बेळीकर, शिवाजीराव पाटील , आनंदराव पाटील, बालाजी वडजे, आदींची उपस्थिती होती इंगोले बंधूंच्या या सामाजिक कार्याचे राज्यभरात सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे.