लोहा| सरस्वती शिक्षक पगारदार पतसंस्था गेल्या ३०वर्षा पासून शिक्षक -कर्मचाऱ्याच्या हिताचे कार्य करते आहे. संस्थापक चेअरमन प्राचार्य राजीव भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने चेअरमन अजय पेठकर व टीम सध्या कार्य करते आहे.कोविडमुळे निधन झालेले शिक्षक प्रशांत मोटरवार यांच्या कुटुंबियांना पतसंस्थेच्या वतीने दोन लक्ष रुपयांची कुटुंब सहायता निधी सानुग्रह अनुदान धनादेश महाराष्ट्र दिनी देण्यात आला.
लोहा तालुक्याती व जिल्ह्यात सरस्वती शिक्षक पगारदार पतसंस्था एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखली जाते .१९९२ मध्ये संस्थापक चेअरमन राजेंद्र भोसीकर व कै एम एस देशमाने यांच्या पुढाकाराने ही पतसंस्था निर्माण झाली. चेअरमन अजय पेठकर, व्हाईस चेअरमन हरीभाऊ चव्हाण, सचिव रवींद्र आप्पाराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरस्वती पगारदार शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित लोहाच्या वतीन कै प्रशांत मोटरवार यांचे वारसदारास रू200000 कुटुंब सहाय्यता निधी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. सन 1992 साली प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या या पतसंस्थेत अनेक सभासदाच्या हिताचे निर्णय घेतले जातात. खर्च कमी व अल्प व्याज दारात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सभासदांना दरवर्षी 10 टक्के लाभांश व ठेवीवर व्याज दिले जाते .मुख्याध्यापक डी एन ठाकूर हे कामकाज पाहत असतात.
कोविडमुळे मागील वर्षी मार्च २०२१ मध्ये शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रशांत सुभाषराव मोटरवार यांचे निधन झाले. पतसंस्थेच्या वतीने कुटुंब सहायता निधी सानुग्रह अनुदान अंतर्गत दोन लक्ष रुपये महाराष्ट्र दिनी त्यांच्या कुटुंबियांना पतसंस्थेचे चेअरमन पेठकर, व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, सेक्रेटरी रवींद्र चव्हाण, शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दामोदर वडजे कै विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी एन ठाकुर पतसंस्थेचे सहसचिव बी एस तांबोळी, वरिष्ठ सभासद गहिलोद यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला. कोरोना काळात मृत्यू झालेल्या सभासदांच पश्चात त्यांच्या कुटुंबियांना मदत करणारी सरस्वती शिक्षक पतसंस्था ही पहिलीच पतसंस्था होय .मोटरवार कुटुंबीयांनी पतसंस्थेचे आभार मानले.