बहुजन समाज शकुनी मामाचा हुजऱ्या नाही - आमदार गोपीचंद पडळकर -NNL


मुंबई।
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असं पुण्याचा सभेत म्हंटलं होत . त्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली . पुण्याच्या सभेत  भयानक फसवा दावा राऊत यांनी केल्याचं पडळकर म्हणाले . कदाचित आम्हा बहुजनांना आपण पण आपल्या सारखाच शकुनी काकाचा हुजऱ्या समजत असाल.

तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये  १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का असा . गेल्या दोन वर्षात एक हजाराच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का   असा सवाल त्यांनी केला . शेतात पीकं असताना शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली,ते शेतकरी बहुजन नाहीत का? आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळं एसी,एसटी ओबीसी,भटके विमुक्त अ,ब,क,ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील आरक्षण मातीत घालवलं गेलं, ते कोणत्या तुमच्या बहुजन प्रेमातून आलं होतं? 

धनगर आरक्षणासंबंधी एक साधी बैठकही तुम्ही अडीच वर्षात करू शकला नाहीत. हे तुमचं कोणत बहुजन धोरणं होत या प्रश्नाची उत्तरं द्या असं आव्हान पडळकर यांनी राऊत यांना दिलं . सरकार स्थापनेच्या वेळेस तुम्ही प्रस्थापितांसोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. पण जेंव्हा आम्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात. कारण कोर्टानं सांगून सुद्धा तुम्ही  अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता

.मुळात तुमची इच्छा हीच आहे की बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या  अश्या शब्दात आमदार पडळकर यांनी समाचार घेतला . बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवता. हे बहुजन समाज विसरलेला नाही.  आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा  गळा घोटणाऱ्या लबांडाचा तुम्ही रोज सकाळी उठून उधो उधो करता. हे बहुजनांचे हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन  केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही. कारण त्या करिता स्वाभिमान असावा लागतो. असं पडळकर म्हणाले

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी