डॉ. विरुद्ध डॉ. असलेल्या निवडणुकीच्या रणसंग्रामात कोण मारणार बाजी ! आजी का..? माजी...?
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड तालुक्यातील मानाची व प्रतिष्ठित मानली जाणारी येवती सेवा सहकारी सोसायटी निवडणूक कार्यक्रम लागला असुन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ ते २८ एप्रिल होती. येवती सेवा सोसायटीचे मावळते चेअरमन डॉ. व्यंकटेश भोसले ( सुभेदार ) यांनी माजी सरपंच विजयकुमार पाटील व पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वसंत पाटील येवते यांना एकत्र घेऊन पार्टी उभा केली आहे.
तर दुसरीकडे मात्र विद्यमान सरपंच डॉ. उमेश पाटील येवतीकर यांनी सेवा सोसायटी निवडणूकीत नवीन पॅनल उभा करुन प्रतिस्पर्धीना आवाहन दिले आहे . अशा प्रकारे येवती सेवा सोसायटी निवडणूकीत डॉक्टर विरुद्ध डॉक्टर सामना रंगणार असून येवती सेवा सोसायटी बिन विरोध होणार की निवडणूक सामना होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
१७ मे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असुन १८ मे रोजी उमेदवार चिन्ह व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २६ मे रोजी मतदान तर २८ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
मे महिन्याच्या तळपत्या उन्हा बरोबरच आता येवती सेवा सोसायटी निवडणूकीचे वातावरणही तापल्याचे दिसून येत आहे. हि निवडणूक आम्ही जिंकणार असे सुभेदार पार्टीच्या उमेदवारांकडून बोलले जात आहे. तर दुसरीकडे मात्र जुन्या पार्टीला चित करुन आम्ही नवीन पॅनल विजयी करु असे डॉ.उमेश पाटील यांच्या पार्टीचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे मात्र मतदार मौन पाळीत असुन या निवडणुकीत कोण जिंकणार अन् कोण हारणार ? कि निवडणुक बिनविरोध होणार का..? हे मात्र येणारा काळच सांगेल! पण सध्यातरी येवती सेवा सोसायटी निवडणूक काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र दिसून येत असून हे निवडणूक बिनविरोध होऊ नये असे नविन पार्टीच्या काही उमेदवारांच मत आहे.
तालुक्यात पहिल्यांदाच सेवा सोसायटी निवडणूकीत डॉ. विरुद्ध डॉ. सामना रंगणार असल्याने या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. हे मात्र निश्चित आहे.