उस्माननगर, माणिक भिसे। येथील मध्यभागी ४० वर्षापासून असलेल्या लिंबाखालचे बालाजी मेडिकल ॳन्ड जनरल स्टोअर्सला ५ मे च्या मध्येरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत मेडिकल ,शालेय साहित्याबरोबर, गल्यातील रोखरक्कम अन्य साहित्य जळून कोळसा होऊन लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.
उस्माननगर ता.कंधार येथील ४० ते ४३ वर्षीपासून रत्नाकर प्रल्हाद अमिलकंठवार यांचे गावातील मध्यभागी असलेल्या बालाजी मेडिकल ॳन्ड जनरल स्टोअर्सचे दुकान आहे.दिवस भर गिराहीक करुन उशीरा नेहमी प्रमाणे दुकान बंद करून अशोक अमिलकंठवार नेहमी सारखे दुकानात झोपी गेले होते.दुकानाच्या वरच्या मजल्यावर केव्हा आग लागली हे,त्यांना कळलेच नाही.जेव्हा त्यांच्या बाजूला वरून एक डबा जळत पडला तेव्हा खरबरडून उठून बाहेर येऊन पाहतात,तर काय ? वरच्या भागात प्रचंड भीषण आग लागलेली दिसली.अशोक सावकार यांनी तात्काळ जिकडे तिकडे फोन लावून नागरिकांना उठून बोलावून घेतले.
उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक डि.देवकते आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.व नांदेड , कंधार येथील आग्नीशमकला फोन लावून त्यांना तात्काळ पोहचण्यासाठी विनवानी करीत होते.पण ते काही येवू शकले नाहीत.त्यांच्या कामचुकार पणामुळे आग आटोक्यात आणता आली नाही.गावातील नागरिकांनी काही अंतरावर असलेल्या बोअरचे पाणी टाकूण आग विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले पण आग ऐवढी वाढली की,आगेवर पाण्याचा काहीही परिणाम झाला नसून पाहातापाहाता भीषण आगीमध्ये मेडिकल व जनरल स्टोअर्स व गल्यातील रक्कम आणि शालेयसाहित्य जळून जवळपास पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.जर दाराला आग लागली आसती तर सावकार बाहेर येऊ शकले नसते.त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
आग्नीश्मकदलाची गाडी जर वेळेवर आली आसती तर आग आटोक्यात आनून दुकानाची होणाऱ्या प्रंचड नुकसानीवर अंकुश ठेवता आला आसता....आग ऐवढी वाढली होती की आकाशाता धुर पसरला होता.जवळच लिंबाच्या झाडाला आग लागली आहे.आचानक लागलेल्या आगीमुळे प्रंचंड नुकसान झाले आहे.