दिव्यांग मुलांसाठी 'अभिनव बालोद्यान' उपक्रमास प्रारंभ -NNL


पुणे।
इतर मुलांबरोबर खेळू न शकणाऱ्या दिव्यांग मुलांसाठी ' अभिनव बालोद्यान ' हा उपक्रम अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आला आहे. श्वेता लिमये यांनी हा  उपक्रम सुरू केला आहे.

नटराज सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या सोसायटीच्या टेनिस ग्राउंडच्या शेजारील मैदान, प्रतिज्ञा हॉलच्या शेजारील गल्ली, (कर्वेनगर ) येथे सायंकाळी  पावणेपाच ते पावणे सहा या वेळेत 'अभिनव बालोद्यान' उपक्रम सुरू  आहे. गरजेनुसार आणि मुलांच्या संख्येनुसार रिक्षा किंवा व्हॅनची सोय करता येईल.


दिव्यांग मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार मनसोक्त मोकळ्या मैदानावर खेळता यावे हा बालोद्यान सुरू करण्यामागचा मुख्य हेतू आहे. खेळाबरोबरच  गाणी, गोष्टी, नाच, श्लोक, प्राणायाम, व्यायामाचे विविध प्रकार अशा गोष्टी घेत असल्याची माहिती ,या बालोद्यानच्या संस्थापिका श्वेता लिमये यांनी दिली. प्रवेशासाठी 5 ते 20 हा वयोगट निश्चित केला आहे. दिव्यांगांच्या प्रकारानुसार मुलांचे गट करून वेगवेगळे खेळ घेतले जात आहेत. त्यासाठी प्रवेश देताना गटांनुसार संख्या निश्चित केली आहे. त्यानुसारच प्रवेश दिला जाईल.

अंशत: दृष्टीहीन(Low Vision) ,शारीरीक अपंगत्व (Physically Handicapped)/ पोलिओ (Polio)/ बहुविकलांग ( Multiple disability) -  अंशतः कर्णबधीर (Partially deaf)/  गतिमंदत्व (Slow Learner)/अध्ययन अक्षम (Learning Disabilities) स्वमग्न (Autism)/ अतिचंचलता अक्षम( ADHD) , सौम्य गतिमंदत्व (Mild Mentally Retardation)/ डाऊन सिंड्रोम ( Down Syndrome) या गटात हा बालोद्यान उपक्रम सुरू आहे. नाममात्र शुल्कासह प्रवेश चालू आहे. 9011043764 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी