माता वासवी कन्यका परमेश्वरी प्रगट दिनानिमित्त सिडको परिसरात शोभा यात्रेत महिला व समाज बांधवांचा सहभाग -NNL


नविन नांदेड।
वासवी व वनिता क्लब सिडकोचा वतीने माता कन्यका परमेश्वरी यांच्या प्रगट दिनानिमित्त  काढण्यात आलेल्या  शोभा यात्रेत फटाक्यांच्या आतिषबाजी सह पारंपरिक वाघंवृदं व ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजता दतकृपा मंगल कार्यालय येथुन काढण्यात आली यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरीक यांच्यासह मान्यवरांच्या सहभाग होता. शोभायात्राचे ठिक ठिकाणी स्वागत व पाणी,व शरबतचे वाटप करण्यात आले तर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

माता कन्यका परमेश्वरी यांच्या प्रगट दिनानिमित्त भव्य शोभायात्रा हडको येथील दतकृपा मंगल कार्यालय पासून हडको बसस्टॉप , ज्ञानेशवर नगर,पाण्याची टाकी, सिडको शिवाजी चौक,ते महादेव मंदिर देवस्थान पर्यंत काढण्यात आली,या यात्रेत डॉ.नरेश रायेवार, बालाजी मंदिर देवस्थान हडको चे अध्यक्ष अरूण दमकोडंवार, बालाजी रहाटकर, संजय पांपटवार, नगरसेवक प्रतिनिधी संजय पाटील घोगरे, प्रभाकर निललावार, लक्ष्मीकांत मुककावार, बालाजी येरावार,विजय गबाळे,विनोद चिद्रवार,आर्य वैश्य संघटनेचे विजय गबाळे व पदाधिकारी, देविदास चिद्रावार,वंसत कवटीकवार,यांच्या सह   समाजातील प्रतिष्ठित नागरीक व मान्यवरांच्यी ऊपसिथीती होती,ठिकाणी ठिकाणी स्वागत तर शनि मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष करणसिंह ठाकूर, प्रकाश सिंह परदेशी, रघुनाथ चव्हाण, गोपीनाथ कहाळेकर,  व पदाधिकाऱ्यांनी स्वागत करुन लिबुंशरबत व्यवस्था केली,तर अनेक ठिकाणी समाज बांधवांचा वतीने फटाक्यांच्या आतिषबाजी व शोभा यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली, मिरवणूक मार्गावर असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यास  पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

मिरवणुकीत असदवन येथील  भजनी मंडळ यांच्या सहभाग होता, सुत्रसंचलन  संजय काचावार यांनी केले अध्यक्ष शिवानंद निलावार, सचिव बालाजी कवटीकवार, कोषाध्यक्ष संदीप येरावार,वासवी वनिता क्लबचा महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले, यावेळी सहभागी पाच महिलांना पैठणी व पुरुषांसाठी एक ग्राम सोने लक्की ड्रा पध्दतीने  काढण्यात आले, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऊतम बुकतरे, पोलीस अंमलदार, पोलीस महिला बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी