अर्धापूर, निळकंठ मदने। तालुक्यातील दाभड शिवारातील भोकरफाटा येथील देशी दारुच्या दुकानाची भिंत फोडुन देशी दारूचे ९ बाॅक्ससह २९ हजारांचा माल लंपास केला असून, अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेरणीच्या दिवसात कृषी केंद्रावर चोरट्यांची नजर असते.
शुक्रवारी २० मे च्या रात्री भोकरफाटा परीसरातील सुभाष कोंडेलवार यांचे देशी दारुच्या दुकानदाच्या भिंतीला दोन मोठे भगदाड पाडून देशी दारुचे ९ बाॅक्स व २७०० रुपये रोख रक्कम असा एकुण २८ ६२० रुपयांची चोरी केली आहे, याप्रकरणी दुकानचे मॅनेजर अनिल शामराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध १०५ अन्वये कलम ४५७,३८० शनीवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी जमादार अविनाश खरबे हे अधिक तपास करीत आहेत.