नविन नांदेड। सिडको क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त नसल्याने नागरीकांच्यी अनेक कामे रेगांळली असुन मनपा आयुक्त यांनी तात्पुरता पदभार कार्यालय अधिक्षक यांना देऊन किंवा सहाय्यक आयुक्त नेमुन नागरीकांच्यी कामे सोडविण्याची मागणी होत आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील सहायक आयुक्त अविनाश अटकोरे हे प्रदिर्घ सेवेनंतर नियोतवयमना नुसार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. या ठिकाणी मनपा प्रशासनाने सेवानिवृत्ती दिवशी नव्याने सहाय्यक आयुक्त पदभार दिला पाहिजे होता पंरतु १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त क्षेत्रीय कार्यालय येथे ध्वजारोहण होते. ते कार्यालय अधीक्षक विलास गजभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, मालमत्ता कर वसुली, नविन नंबर देणे, गुंठेवारी यासह हे क्षेत्रीय कार्यालय वसुली मध्ये आघाडीवर असतांना मनपा प्रशासनाने सहाय्यक आयुक्त नव्याने देण्यासाठी चालढकल केली आहे.
एक ते आठ मे दरम्यान दोन ते तिन दिवस सुट्या असल्याने मनपा प्रशासनाने दुर्लक्ष करत सहाय्यक आयुक्त नव्याने दिला नाही व तात्पुरता पदभार दिला नाही. त्यामुळे प्रलंबित असलेले अनेक कामे व दैनंदिन कार्यालयीन कामासह अनेक कामे,नावपरिवतन, नविन नंबर, मालमत्ता धारकांची असलेली अनेक कामे, स्वच्छता अहवाल यासह अनेक कामे रेगांळली असुन, आयुक्त डॉ सुनिल लहाने तात्काळ सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त नेमावा किंवा तात्पुरता पदभार कार्यालय अधिक्षक यांना देऊन प्रलंबित कामाचा निपटारा करावा अशी मागणी नागरीकातुन होत आहे.