उस्माननगर, माणिक भिसे। येथील ग्रामपंचायत सदस्य तथा विविध क्षेत्रातील पदावरून प्रत्येक घटकातील व्यक्तींच्या मनात घर करून वास्तव करणारे आणि सामाजिक उपक्रमांतून जनतेमध्ये कोणत्या ना कोणत्या नेहमी चर्चेतून समाजामध्ये आदर्श घडविणारे उपक्रमशील सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर काळे व कोमल काळे या दापत्य परिवाराने आपल्या घराच्या छताला पक्षाना उन्हापासून बचाव करण्यासाठी चारा- पाण्याची व्यवस्था केल्याने पक्षावर प्रेम करणारे काळे परिवार अन् या कुटुंबावर प्रेम करणारे पक्षी याची चर्चा होताना दिसत आहे .
मागील महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण अधिक वाढल्याने नागरिकाबरोबर मुक्या जनावरांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे.पशुपक्षी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी सावलीचा आसरा घेतात.सकाळी ९ वाजल्यापासून उष्णतेचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होत आहे. शेतकरी खरिप पूर्वी शेतातील कामे सकाळी १० पर्यंत उरकून घेताना दिसत आहेत. नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंड पेय,जलपाणी कडे वळला आहे. तर मुक्या जनावाराचा जीव कासावीस होताना दिसतो आहे.या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे.
अनेकांना उन्हामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.खाजगी व सरकारी दवाखान्यात मेडिकलवर नागरीक धाव करताना आढळून येतात.तर मुक्या लहान पक्षांनी जावे कुठे .... कोणाकडे हात पसरावा.....गावात पक्षांना बसण्यासाठीचे जूने वाडे कमी प्रमाणात दिसतात.पण त्यांच्या जीवासाठी लागणारे अन्न,पाणी उन्हात फिरून कुठून आणणार , परिसरात उन्हाचा पारा ४१ ते ४२ पर्यंत येऊन ठेपला आहे. माणसाप्रमाणे प्राणी, पशुपक्षी ही पाण्याच्या शोधात वनवन भटकताना दिसतात.निर्जलीकरण व उष्माघाताने अनेक पक्षी मृत्यूमुखी पडत आहेत.
पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून या माणूसकीच्या नात्याने उस्माननगर येथील ग्रामपंचायत सदस्य तथा विविध क्षेत्रातील पदावरून प्रत्येक घटकातील व्यक्तींच्या मनात घर करून वास्तव करणारे व पशुप्राणी प्रेमी , सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर काळे व कोमल काळे या दापत्य परिवाराने आपल्या घराच्या छताला छानदार कुंड्या आडकावून पक्षाची तहान भागवण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे.त्यामुळे नागरीक पक्षीप्रेमी काळे परिवाराच्या या उपक्रमाबद्दल पक्ष्यांवर प्रेम करणारे काळे कुटुंब म्हणून पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.