अंदाजे 2 लक्ष 81 हजार 400 रुपये किमतीचा माल लंपास
हिमायतनगर, अनिल मादसवार। तालुक्यात चोरी लुटमारीचे सत्र थांबण्यास तयार नाही, अशीच एक घटना सोनारी फाटा येथे घडली असून, अज्ञात चोरांनी साई वेअर हाऊसचे शटर वाकवून ५० पोते सोयाबीन अंदाजे 2 लक्ष 81 हजार 400 रुपये किमतीचा माल लंपास केल्याची घटना दि. २० शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली आहे. एवढेच नाहीतर चोरट्यांनी प्रत्येक पोते चेक करून सर्वाधिक भाव असलेले नगदी रक्कम मिळणारे सोयाबीन चोरून नेलं आहे.
नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाट्या जवळ मुख्य रस्त्यावर डॉ राजेंद्र वानखेडे यांचं साई वेअर हाऊस आहे, शेतकऱ्यांना सुविधा मिळावी या उद्देशाने बांधण्यात आलेल्या वेयर होऊसचे शटर वाकवून त्यामध्ये असलेल्या शेतकऱ्यांचं जवळपास सोयाबीनचे ५० पोते अंदाजे 1 लक्ष 51 हजार 200 व 1 लक्ष 30 हजार 200 असे एकूण 2 लक्ष 81 हजार 400 रुपये किमतीच्या मालाची चोरी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागासह परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साई वेअर हाऊस ला अनेक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन सुरक्षित राहते असे समजून सोयाबीन ठेवले होते. परंतू चोरट्यांनी नियोजन बद्य पद्धतीने चोरीचा प्रकार केला आहे. हे चोरटे सि. सी. टिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
याची माहिती मिळताच घटनास्थळावर बिट जमादार कदम व मेडके यानी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत डॉ राजेंद्र वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध हिमायतनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, या घटनेतील चोरट्यांचा तपास करण्याचे आवाहन हिमायतनगर पोलिसांसमोर उभे आहे.