हातणी परिसराला ३३ केव्ही वीज उपकेंद्राची आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
हातणी ता.लोहा  परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी होणारा विजेचा तुटवडा दूर होण्यासाठी मंत्रालय स्तरावर लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नातून व तळमळीने पाठपुरावा करून 33 केव्ही वीज उपकेंद्राला दोन कोटी ५८ लक्ष ४७  हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला .

आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मतदारसंघातील मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून हातणी परिसरातील शेतकरी वर्ग व सर्वसामान्य जनतेचा प्रश्र्न सुटण्यास हातभार लावला आहे. 33 केव्ही उपकेंद्र उभारण्याच्या कामाची अधिकृत निविदा प्रसिद्ध झाल्याने हातनी येथील उपकेंद्र अत्याधुनिक व दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर उभारण्यात येईल असा विश्वास लोहा ,कंधार चे कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी व्यक्त केला. 

हातणी ता.लोहा  येथे 33 केवी वीज उपकेंद्र उभारले जावे म्हणून लोहा, कंधार चे कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वेळोवेळी तळमळीने पाठपुरावा केला होता. यात 33 केव्ही उपकेंद्र निर्मितीला 2 कोटी 58 लाख 47 हजार रुपयांचा निधी आमदार शिंदे यांनी मंजूर करून आणला.हातनी भागात अत्याधुनिक होणारे 33 केवी चे वीज उपकेंद्र मंजूर झाल्याने या भागातील विजेची समस्या मिटणार आहे.

आमदार शिंदे यांनी  हातणी येथे अत्याधुनिक पद्धतीचे 33 केव्ही वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र लवकरच उभारण्यात  येणार असल्याने कापसी ,मारतळा सह उमरा सर्कल मधील  शेतकऱ्यांना होणारा विजेचा त्रास मिटणार असून या भागातील  सर्व सामान्य नागरिकांना या उपकेंद्राचा मोठा फायदा होणार असल्याने या भागातील नागरिकांनी लोहा कंधार चे कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी