नवीन नांदेड। नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत असलेल्या एनडी-४२, डी-३, परिसरातील जेष्ठ नागरिक तथा 'आयडीबीआय' बँकेतील सेवानिवृत्त लिपिक बाबूराव मल्लिकार्जुन स्वामी-कवठेकर (वय-७३ वर्षे) यांचे ६ मे रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिव देहावर ६ मे रोजी रात्री उशिरा नवीन नांदेड परिसरातील 'वैकुंठधाम' स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. लेखापाल समाधान स्वामी-कवठेकर यांचे 'ते' वडील होत.