नांदेड। येथिल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या १ जुलै पासून घेण्यात यावे अशी मागणी एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतिने कुलगुरू डाॅ. उद्धव भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.
विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलातील प्रथम व तृतीय सत्राच्या हिवाळी परीक्षा या साधारणपणे दहा मार्च पर्यंत पूर्ण झाल्या. त्यानंतर दुसऱ्या व चौथ्या सत्राचे क्लासेस हे जवळपास १५ मार्च पासून सुरु झाले. या कालावधीचा विचार करता दुसऱ्या व चौथ्या सत्राच्या उन्हाळी परीक्षा या जुलै महिन्यात घेणे क्रमप्राप्त आहे. तसेच मागच्या दोन्ही सत्राचे प्रात्यक्षिक घेणे बाकी आहे. ऑनलाइन तासिका असल्याने प्रात्यक्षिक झाले नव्हते. यूजीसीच्या नियमावलीनुसार एका सत्रासाठी ९० दिवसाचा कालावधी ठरवून दिलेला आहे. त्यामध्ये सुट्या वगळून हा कालावधी ग्राह्य धरला जातो. या नियमावलीनुसार या सत्रासाठीचा कालावधी हा जुलै महिन्यात पूर्ण होत असताना विद्यापीठाने जुन मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतले आहे. १५ मार्च ते ६ जून या कालावधी विचार करता फक्त क्लासेस झालेले ६९ दिवस होत आहेत. तर त्यामध्ये २० दिवस सुट्या होत्या.
विद्यापीठ यूजीसीच्या नियमांना फाट्यावर मारत केवळ ७० दिवसात सत्र गुंडाळत आहे. ९० दिवसानंतर परीक्षा घेतल्यास विद्यापीठाला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही कारण हे विद्यार्थी प्रथम व द्वितीय वर्षाचे आहेत पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कोणतेही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. त्यामुळे कुलगुरू महोदयांनी विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलाच्या उन्हाळी परीक्षा ९० दिवसाचा कालावधी पुर्ण करूनच घ्यावेत अन्यथा एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याा इशारा देण्यात आला.
अनेक संकुलाचा अभ्यासक्रम देखील पुर्ण झालेला नसताना विद्यापीठाने जुन मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतले आहे. ते अंत्यत चुकीचा आहे. अभ्यासक्रमच पुर्ण झालेला नाही तर विद्यार्थ्यांनी परीक्षा तरी कशी द्यावी हा मोठा प्रश्न पडला आहे. विद्यार्थ्यांची मागणी आहे की ९० दिवसाचा कालावधी पुर्ण करूनच परीक्षा घ्यावेत. त्यामुळे कुलगुरू सरांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा अन्यथा एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. काॅम्रेड पवन जगडमवार, एसएफआय विद्यापीठ कमिटी नांदेड