नांदेड| जानापूरी-विष्णुपूरी जवळील राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटक महामंडळाची बस व नांदेडच्या एका छोटा हत्ती मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गांच्या जनपुरी कैम्पजवळ घडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेडकडून - गुलबर्गाकडे जाणारी कर्नाटक महामंडळ बस क्रमांक के.ए.३८ एफ.१०२१ ही बस नांदेड बसस्थानकातून प्रवाशी घेऊन निघाली होती. भरधाव वेगात जात असलेल्या या बसने समोररून नांदेडकडे येणाऱ्या एका मालवाहू टेम्पो क्रमांक एम. एच.२६ ए.डी.८११५ मिनीडोर छोटा हत्ती या टेम्पोला धडकली.
या धडकेने झालेल्या अपघातात मालवाहू टेम्पोमधील राम लक्ष्मण चिंतलवार वय ३८ वर्ष आणि धोंडीबा लक्ष्मण केंद्रे वय ५५ या दोघांचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले आणि त्यांचे सहकारी पोलीस घटनास्थळी पोहचले. जखमींना तातडीने रुगणालयात हलवीण्यात आले.