लग्नाहून हिमायतनगरकडे येणाऱ्या व्यापाऱ्यांची कार अर्धवट टोलनाक्याच्या पिल्लरला धडकली -NNL

४ जखमी, एक गमाभीर; कारचे मोठे नुकसान 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
 म्हैसा येथे एका नातेवाईकाचे लग्नकार्य आटोपून हिमायतनगर गावाकडे येणाऱ्या व्यापाऱ्यांची ह्युंदाई कार तालुक्यातील मौजे सोनारी - पोटाच्या मध्यभागी असुर असलेल्या अर्धवट टोलनाक्याच्या पिल्लरला धडकली. हि घटना दि.२६ च्या माद्यांर्तरील ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून, एकव्यापाऱ्यास गंभीर मार लागला आहे. दैव बलवत्तर म्हणून सर्वच जण सुखरूप असून, त्यांच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरातील एका व्यापाऱ्याचे लग्न तेलंगणा राज्यातील म्हैसा येथे दि.२६ रोजी होते. या लग्नसोहळ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी ५ व्यापारी ह्युंदाई करणे गेले होते. लग्नसोहळा थाटात पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या करणे हिमायतनगर येत असताना अचानक रोटरी ११.३० वाजेच्या सुमारास हिमायतनगर तालुक्यातील सोनारी व पोटा गावाच्या मध्यभागी ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत ठेवलेल्या टोल नाक्याच्या जवळील खड्ड्यामुळे चालकाचा तोल गेला. आणि सदरील कार थेट टोलनाक्याच्या पिल्लरला धडकून अपघात झाला. 


या अपघातात कारच्या समोरील भाग चुरा झाला असून, व्यापारी उमेश मामीडवार यांना गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्याचं कारमध्ये असलेले अन्य व्यापारी संतोष रेखावार, श्रीनिवास चिद्रावार, किशोर रायेवार आणि महेश मारुडवार यांना या अपघात दुखापत झाली आहे. या सर्वांवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, दैव बलवत्तर आणि वाढवण्याच्या परमेश्वराच्या कृपेने सर्वच जण सुखरूप असल्याची माहिती राजू पिंचा यांनी दिली.

एकूणच गेल्या काही वर्षपासून हिमायतनगर - भोकर मार्गावरील टोलनाक्याच्या काम ठेकेदारने अर्धवट ठेवले आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी टोलनाक्यासाठी भूसंपादित केल्या त्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासन वंचित ठेवले आहे. रस्ताही शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र अजूनही शेतकऱ्यांना मोबदला मिळला नसल्याने शेतकरी न्यालयाच्या मार्गावर आहेत. हि बाब लक्षात घेता संबंधित विभागाने टोलनाक्यासाठी संपादित केलेल्या शेतजमीन मालकांना तातडीने मोबदला देऊन अर्धवट टोलनाक्याच्या काम पूर्ण करून भविष्यात अपघात होणार नाहीत यासाठी ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी हिमायतनगर शहरातील व्यापार्यांच्या परिसरातील गावाच्या नागरीकातून केली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी