मालेगाव/ नांदेड| तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मालेगाव ग्रामसचिवालयातील गाळ्यांचा लिलाव नियमानुसार व्हावा या साठी काही महिन्यापूर्वी बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष सुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी उपोषणाची जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी दखल घेऊन लिलाव नियमानुसार पुन्हा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते.
त्या नुसार ग्रामपंचायत ने सरपंच अनिल ईंगोले, ग्रामसेवक निलमवार,उपसरपंच मनोहर खंदारे यांनी लिलाव प्रक्रिया जाहीर करून 26 रोजी लिलाव केला. त्यात अनेक व्यावसायिकांनी भाग घेतला. मागील 20 वर्षा पासून नियमबाह्य पद्धतीने नाममात्र म्हणजेच फक्त 1 लाख अनामत रक्कम घेऊन गाळे वाटप करण्यात आले होते परंतू संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे नियमानुसार लिलाव केला असता 80 लाख रुपयाची अनामत रक्कम ग्रामपंचायतला मिळाली.
जिथे ग्रामपंचायतला एकूण 17 लाख अनामत मिळत होती तिथे आत्ता मात्र 80 लाख अनामत मिळाली. गावातील नागरिकांकडून संघर्ष समितीचे आभार मानण्यात येत आहेत. तसेच ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढवल्यामुळे सरपंच अनिल ईंगोले यांनी संघर्ष समीतीचे अध्यक्ष सुभाशिष कामेवार यांचा पुष्पहार घालुन सत्कार केला.
अनामत रकमेच्या पोटी मिळालेल्या 80 लाख रुपयाच्या व्याजावर ग्रामपंचायत गावातील नागरिकांना नागरी सुविधा, तसेच कर्मचाऱ्यांच वेतन वेळेवर देऊ शकेल.सुरवातीला नियमबाह्य पद्धतीने लिलाव न करता गाळे वाटप करन्याचा हेतु ग्रामपंचायतचा पदाधीकार्यांचा होता परंतु संघर्ष समीतीच्या आंदोलना मुळे ग्रामपंचायत झुकली. अशी प्रतिक्रिया सुभाशिष कामेवार, अध्यक्ष बेरोजगार संघर्ष समीती मालेगाव यांनी दिली.