लोह्यात टीप्पर दुचाकीला धडकले; दैव बलवत्तर म्हणून दाम्पत्य बचावले -NNL


लोहा।
 शहरातून जाणाऱ्या नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या ठिकान असलेल्या छत्रपती शिवाजी चौकाच्या ठिकाणी  अवैद्य प्रवासी वाहतूकीने कळस मांडला आहे. त्यामुळे उभी असलेली वाहने, फळ विक्रेत्यांचे गाडे तसेच इतर दुकानदाराने रस्त्यापर्यंत अतिक्रमण आणल्यामुळे नेहमी अपघाताच्या घटना घडत आहेत. आज टीप्पर बसस्थानक कडून शिवाजी चौक मार्गे गंगाखेड रस्त्याकडे जात असताना मोटार सायकलीस टीप्परची जबर धडक लागून मोटार सायकलचं नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून की काय, पती-पत्नी बालंबाल बचावले. ही घटना दि. २२ च्या रविवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली.

मागील महिनाभरापूर्वी कंधार रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला भरधाव वेगातील वाळूच्या टीप्परने जबर धडक देवून गंभीर जखमी केले होते. आणि घटना घडताच सदर टीप्पर घटनास्थळावरून पसार झाला होता. कांहीं सामाजिक संघटनेच्या रेट्यामुळे पोलिसांनी शोध कार्य हाती घेवून आठ दिवसात अपघातास कारणीभूत ठरलेला टीप्पर ताब्यात घेवून मालक सोडून चालकाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र महसूल प्रशासन रेती माफियांना पाठीशी घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतानाचे दिसून आले. 


एकीकडे लोहा तहसील हद्दी अंतर्गत कुठेच रेती उपसा व वाहतूक नाही म्हणणाऱ्या महसूल प्रशासाची वाळू चोरी यानिमित्ताने उघड पडली. त्यानंतर कांहीं अंशी रेती उपसा व वाहतूक लपून-छपून सुरू होती मात्र सदर घटनेचा विसर पडताच पुन्हा नव्या जोमाने रेती माफिया वाळूच्या गोरख धंद्यात महसूल व पोलिस प्रशासनाला सोबत घेवून उतरले असून टीप्पर रस्त्यावरून धावतानाचे चित्र आजघडीला दिसून येत आहे.

लोहा शहरातील बुरुड गल्ली येथील जळबा मारोती गुंठे (वय ४२) व त्यांची पत्नी मोटारसायकल क्र. एम एच २६ ए १ ६८७३ वरून नांदेड कडे जात असताना बसस्थानक वरून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या टीप्पर क्र. एम एच २६ बी ई ४४८३ ने सदर मोटार सायकलीस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक झाली. त्यात मोटार सायकलचे मोठे नुकसान झाले. परंतु सुदैवाने मोटारसायकस्वार गुंठे पती-पत्नी बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी अद्याप पर्यंत लोहा पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी