नांदेड। संभाजीनगर येथे असलेली औरंगजेब यांची कबर संभाजीनगर येथून हलवून हैदराबाद येथे स्थापित करावा अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे केली.
भारतीय इतिहासाला भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारा फासणारा असणारा औरंगजेब यांनी स्वतःच्या वडिलावर भावा वर अत्याचार करून छळ करून मुगल साम्राज्य कशाप्रकारे क्रूरतेने वागते हे औरंगजेबाने वारंवार आपल्या विविध कृत्यातून करून दाखवल्या आशा क्रूरतेने वागणारा औरंगजेबची कबर महाराष्ट्रात आतापर्यंत आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ कशा प्रकारे करण्यात आला सर्व मराठी जनता जाणते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत सर्व जातीचे लोक एकमेकांविषयी आपुलकी सद्भावनेने आपल्या आपल्या धर्माचे पालन करत गुण्यागोविंदाने वागत राहत असताना हैदराबाद येथील एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्र देऊन औरंगाबाद येथे औरंगजेबच्या कबरी वर पुष्पांजली अर्पण करणे म्हणजे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून यामुळे जातीय द्वेष पेरला गेला .
औरंगजेबाने भारतात भारतीय संस्कृतीवर व जनतेवर कशाप्रकारे अन्याय अत्याचार केला हे द्यात असतानासुद्धा भारत स्वतंत्र झाल्या वरही औरंगजेब यांची कबर आतापर्यंत आहे हे भारतीय संस्कृतीचे भारतीय जनतेचे दुर्दैव या भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारा औरंगजेब याचा विचार आचार व अस्तित्व नष्ट करून भविष्यात जातीय तणाव निर्माण होऊन दंगली पेटवू नये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून औरंगजेब यांची कबर तात्काळ हैदराबाद ला हलवून महाराष्ट्रात होणारा रक्तपात ताबडतोब थांबावा अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेब महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्याकडे केले.