काशी, मथुरा येथील हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच राहणार - अधिवक्ता मदन मोहन यादव -NNL

 'ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण न्यायालयाचा आदेश सर्वोच्च कि मुसलमान जमावतंत्र ?'


मुंबई। 
न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी तेथील मुसलमानांनी विरोध करत आयुक्त आणि अधिवक्ते यांना मशिदीत प्रवेश करू दिला नाही
ही यांची दुष्टता आणि शिरजोरी आहेते वारंवार न्यायालयाची अवहेलना करत आहेतन्यायालयापेक्षा स्वत:ला मोठे समजत आहेत

वस्तुतः मुसलमानांच्या प्रत्येक मागणीला या देशात मान्य केले गेलेन्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्या येथील राममंदिर जरी आम्ही मिळविले असलेतरी काशीमथुरा येथील हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच राहणारअसे स्पष्ट प्रतिपादन वाराणसी येथील जिल्हा न्यायालयाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी केलेहिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित 'ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण न्यायालयाचा आदेश सर्वोच्च कि मुसलमान जमावतंत्र ?' या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

यावेळी 'काशी ज्ञानवापी अभिमुक्त न्यासा'चे अध्यक्ष पंडित हरिहर पांडेय म्हणाले कीज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाला मुसलमान घाबरत का आहेत तिथे आमचे शिवलिंग आहे आणि देवतांच्या प्रतिमा आहेतहे सत्य समोर येणार याची भीती आहे का जर ते खरे आहेततर सर्वेक्षण होऊ द्यावे न्यायालयाचा निकाल अंतिम आणि सर्वमान्य असतोमात्र त्यांनी हे मान्य केले नाहीधर्मांध जमावाचे यापुढे काही चालू देणार नाहीकाशी येथील मंदिर हे आमचेच होते आणि आम्ही ते मिळवणारच.

हिंदु जनजागृती समितीचे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्रीविश्‍वनाथ कुलकर्णी म्हणाले कीज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण मुसलमानांनी रोखल्यावर तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प आहेत आता देशाचे संविधान आणि कायदा धोक्यात येत आहेअशी ओरड ते करणार नाहीत मुसलमानांचे जमावतंत्र जर असेच वरचढ राहिलेतर लोकांचा न्याययंत्रणेवरील विश्‍वास उडून जाईलज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये दंगलखोरांच्या अवैध अतिक्रमणावर योगी सरकारने बुलडोझर फिरवून त्यांना धडा शिकवलात्याचप्रकारे या जमावतंत्राला धडा शिकविला पाहिजेया वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्रीविनोद बंसल म्हणाले कीज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण का रोखले जात आहे या मशिदीमध्ये काय असे आहेजे लपविले जात आहे सर्वांसमोर सत्य येणे आवश्यक आहेया मशिदीचे सर्वेक्षण ज्यांनी रोखलेत्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी.

श्रीरमेश शिंदेराष्ट्रीय प्रवक्तेहिंदु जनजागृती समिती (संपर्क : 99879 66666)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी