नविन नांदेड। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नांदेड व स्पोर्टस मल्लखांब असोसिएशन नांदेड ,यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी निशुल्क जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व क्रीडा स्पर्धा 18मे रोजी या शिबिराची सांगता मान्यवरांच्या उपस्थितीत जिजाऊ सृष्टी मैदान सिडको येथे करण्यात आली,या वेळी सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नांदेड व स्पोर्टस मल्लखांब असोसिएशन नांदेड ,यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी निशुल्क जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व क्रीडा स्पर्धा दि १८ मे रोजी संपन्न झाले हे प्रशिक्षण शिबीर जिजाऊ सृष्टी मैदान सिडको येथे उन्हाळी सुटया मध्ये इच्छुक विद्यार्थी यांच्या साठी १० दिवसााचे निशुल्क प्रशिक्षण शिबीरााचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्याातुन विद्यार्थी व विद्याार्थीनी खेेळाडु सहभाग नोंदविला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे स्पोर्ट संचालक डॉ.विठ्ठल सिंह परिहार, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, नांदेड तालुका क्रीडा अधिकारी गुरुदीप सिंग संधू ,मेजर रायफल असोसिएशन चे सचिव प्रीतपाल सिंग, नांदेड स्पोर्टस मल्लखांब असोसिएशन अध्यक्ष ज्योती मॅडम, सचिव कुलदीपसिंग जट, विनोद वाघमारे ,कपिल गायकवाड, मनोज मिसाळे यावेळी उपस्थित होते,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने खेळाडूंना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले,हा कार्यक्रम यशस्वी करण्याासाठी नांदेड स्पोर्टस मल्लखांब असोसिएशन चे सचिव सरदार कुलदिप सिंघ जट यांनी परिश्रम घेतले.