नविन नांदेड। सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील अनेक भागात सकाळी मान्सुन पुर्व पाऊसाने जोरदार हजेरी लावली होती,या अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजार परिसरातील व मुख्य रस्त्यावरील हातगाडे व फळविक्रेते यांच्यी धावपळ उडाली, तब्बल एक तासाने पाऊस थांबला. काही प्रमाणात गर्मी तुन सुटका झाल्याचा दिलासा नागरीकांना मिळाला.
मान्सुन पुर्व तयारी साठी शेतकरी राजा गेल्या अनेक दिवसांपासून शेतीची मशागतिचा तयारी साठी लागला होता तर ग्रामस्थ घरावरील डागडुजी पत्रे, निपटारा करण्याचा तयारीत होता, मनपा शहरी भागातील सिडको व क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग 19,20 मध्ये सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोधदीन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे व अरजृन बागडी हे नाले साफ सफाई कामाला सुरुवात केली होती, अचानक 19मे रोजी सकाळी 9वाजता आकाशात आलेल्या काळोख व हवा आणि मान्सुन पुर्व पावसानी हजेरी लावली ,सकाळपासून मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस शहर व ग्रामीण भागात पडला.
विष्णुपुरी,कांकाडी,तुप्पा, बाभुळगाव,यासह परिसरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस झाला असून शहरी भागातील सिडको हडको परिसरात आठवडी गुरूवार बाजारसाठी आलेल्या ग्रामीण भागातील व भाजीपाला विक्रेते यांना मात्र पाऊसाचा फटका बसला, रोडवरील असलेल्या हातगाडे, फळे विक्रेते यांच्या सह व्यापारी यांना धावपळ करावी लागली.
सिडको हडको परिसरातील नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहु लागले,आचनक आलेल्या पाऊसाने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली उन्हाळ्याची तिव्रता कमी दिसुन आली, दिवसभर ऊकडा असलातरी वातावरण झालेला बदल ग्रामस्थ व नागरिक यांना पहावयास मिळाला.