मयत बसवराज सोनवणे अपघात प्रकरणातील टिप्पर पोलिसांच्या ताब्यात; चालकावर गुन्हा दाखल -NNL


लोहा।
कंधार रोडवर नित्यनियमाने मॉर्निग वॉक करणाऱ्या बसवराज शिवराज सोनवळे या महाविद्यालयीन तरुणास नंबर प्लेट वर वॉर्निस लावलेल्या एका टिप्परने ३०एप्रिल राजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास उडविले त्या तरुणावर  नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पण आज बुधवारी ( ता.४ मे) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेतील टिप्पर व चालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 लोहा शहरातील बसवराज शिवराज सोनवणे(वय २४ वर्ष) यास कंधार रोडवर टिप्परने उडविले होते त्यात त्याचा ४, मे रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला .या काळात टिप्पर चा शोध लागला नव्हता. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणला.तहसीलदार व्यंकटेश मुंडे , पोलीस निरीक्षक संतोष तांबे  यांनी नातेवाईकाना सदरील घटनेत सर्व सहकार्य कारण्याचे आश्वासन दिले देऊळगाव येथे शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. बियाणी खून प्रकरणा च्या तपासात पोलीस निरीक्षक संतोष तांबे आहेत . 

  संवेदनशील मनाचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी या प्रकरणात टिप्परचा शोध सुरू केला सगळी यंत्रणा कामाला लावली तहसील रोड अपघातातील टिपर क्र (MH48AG-8427 ) नांदेड येथे शुक्रवारी ताब्यात घेतले व लोहा पोलीस ठाण्यात   आणला. धडक देऊन फरार झालेला आरोपी चालक संतोष शंकरराव गव्हाणे (वय 23 वर्षे रा मुखेड)  यास मुखेड येथून पोलिसांनी  ताब्यात घेतले  .लोहा ,पोलीस ठाण्यात  चालकां विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरणेअंतर्गत भादवि  कलम ३०४ अ, कलम २७९, ३३८ मोटार वाहन कायदा १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजोबा खविसंचे संचालक डिंगबर सोनवळे यांनी ही फिर्याद दिली . पंचायत समिती अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवराज दिंगबर सोनवळे यांचा मुलगा बसवराज हा बीएस्सी (मॅथ) सेंकड इयर मध्ये शिक्षण घेत होता.त्याच्या मृत्यूमुळे सोनवणे कुटुंब कोलमांडून पडले आहे. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती सोनकांबळे हे तपास करीत आहेत. या टिप्पर मालकावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी