माता रमाई स्मृतिदिनानिमित्त देगाव चाळ येथे जुनाट रोगांवर प्रबोधन आणि विनामूल्य उपचार शिबिर -NNL


नांदेड।
जागतिक बौद्ध परिषदेचे प्रादेशिक केंद्र - प्रज्ञा करुणा विहार समिती देगांवचाळ नांदेड आणि मातोश्री रमामाता आंबेडकर महिला मंडळ देगांवचाळ  यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री रमामाता आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ नांदेड येथे जागतिक किर्तीचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ सिद्धार्थ जोंधळे यांचे महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश बोटलावार, सौ. ज्योत्स्ना गोडबोले नगरसेविका, सौ. दीक्षा धबाले माजी महापौर नगरसेविका, मिलिंद शिराढोणकर, साहेबराव थोरात, सुभाष लोखंडे यांच्या उपस्थितीत आणि प्रकाश येवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक सुभाष लोखंडे यांनी दिली.


या आरोग्य शिबीरात दमा, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, लहान मुलांचा मतिमंदपणा, किडणीचे आजार, लहान मुलांना झटके येणे, अपचन, पोटांचे आजार, थॉयराईड, शुगर, मासिकपाळी वेळेवर न येणे, पांढरा पदर जाणे, कॅन्सर इत्यादी 200 च्या वर जूनाट आजारांवर प्रबोधन करुन विनामूल्य औषधोपचार सुद्धा करणार आहेत. युएसए कडून यंग मेडिकल सायंन्टीस्ट पुरस्कार, कैनडाच्या ए.एम.आय.आर. संस्थेकडून फिजिशियन ऑफ दी न्यू मिलिनियम पुरस्कार, इंटरनैशनल हैनीमन ऑवार्ड विजेता, अल्बर्ट स्वाईझर ऑवार्ड विजेता हे पुरस्कार प्राप्त यावेळी शास्त्रज्ञ डॉ सिद्धार्थ जोंधळे हे  प्रज्ञा करुणा विहार समिती आणि मातोश्री रमामाता आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने आयोजित शिबिरात प्रबोधन आणि विनामूल्य उपचार करणार आहेत.

तसेच सविताताई नितीन कोकरे यांच्या वतीने सर्वांना खीर दान केली जाणार आहे. तरी एनटीसी मिल्स परिसरातील रहिवाशांनी आणि खास करून महिलांनी या आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प्रज्ञा करुणा विहार समिती आणि मातोश्री रमामाता आंबेडकर महिला मंडळाच्या उपासिका गयाबाई हाटकर चौत्राबाई चिंतोरे, भीमाबाई हाटकर, शिल्पा सुभाष लोखंडे, सविता नांदेडकर, गीरजाबाई नवघडे, शोभाबाई गोडबोले, लक्ष्मिबाई नवघडे, गयाबाई लांडगे, आशाबाई हाटकर, सुमनबाई वाघमारे, करुणाबाई गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी