तथागत गौतम बुद्ध भारताचे विश्वचित्र - दीपक कदम -NNL


नांदेड।
जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. बुद्ध तत्त्वज्ञानाची गरज आहे असे सर्वजण म्हणतात. ते खरेही आहे. बौद्ध धम्म जगभर पसरला असला तरी भारताला बुद्धाचाच देश म्हटले जाते.‌ तथागत गौतम बुद्ध हे भारताचे विश्वचित्र बनले आहेत असे प्रतिपादन येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले. ते खुरगाव येथे बुद्धमूर्ती भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. 

यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा आॅल इंडिया भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो, भिक्खूनी वंदना,  विपश्यनाचार्य गौतम भावे, रत्नमाला भावे, शाखाधिकारी गणपत सोनकांबळे, इंजि. भारतकुमार कानिंदे, प्रा. सुभाष मस्के, उद्योजक यशवंत उबारे, अनिल हंकारे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, सुरेखा इंगोले, शैलजा लोणे, आम्रपाली जोंधळे, प्रफुल्लता वाठोरे, प्रा. एस.एच. हिंगोले, सुशिला हिंगोले, प्रा. विनायक लोणे, प्रज्ञाधर ढवळे, निवृत्ती लोणे, श्रीरंग थोरात, प्रा. गायकवाड, रावणगावकर, लांडगे आदींसह भिक्खू संघाची उपस्थिती होती. 


ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा परिसरात अकरा फुटांच्या अखंड पाषाणातील संगमरवरी बुद्धमूर्तीचा भूमीपूजन सोहळा दीपक कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. बुद्ध पौर्णिमेनिमित्त खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना कदम म्हणाले की, भविष्यात श्रामणेर प्रशिक्षण केंद्र समाजासाठी प्रकाशमार्ग ठरेल, येथून असंख्य विद्वान भिक्खू तयार होऊन बाहेर पडत आहेत. हे प्रशिक्षण केंद्र सतत कार्यरत असून कोरोनाकाळातील टाळेबंदीच्या काळातही पंय्याबोधी थेरो यांनी धम्मचळवळ थांबू दिली नाही. या ठिकाणी प्रतिष्ठापित होणारी मूर्ती सर्वांचेच आकर्षण ठरेल. या वातावरणात प्रज्ञा, पंचशिल आणि करुणेची सम्यक दृष्टी निर्माण करणारे तरंग उठत राहतील. आंबेडकरवादी मिशन या प्रशिक्षण केंद्राच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणार आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप धूप आणि पुष्प पूजन करण्यात आले. ज्या ठिकाणी बुद्धमूर्ती बसवण्यात येणार आहे त्या जागी पुष्पपाकळ्यांनी अत्यंत मनमोहक पद्धतीने सजविण्यात आले होते. तेथेच त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. बोधीपुजा, सूत्तपठण घेण्यात आले. सुरेखा इंगोले आणि साहेबराव इंगोले यांच्या परिवाराकडून भोजनदान देण्यात आले. दरम्यान, भिमराव आवटे, सुकेशनी गोधने, कुंदन ठाकूर, प्रबुद्ध काळे, केतन काळे, आशिष राझकुंदन, राजकुमार कांबळे, साहेबराव नरवाडे, रणजीत गोणारकर, नागोराव डोंगरे, दयानंद वायवळ, अंजना बुक्तार या श्रद्धावान उपासकांनी भेट दिली. बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या श्रामणेरी श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. भूमीपूजन सोहळ्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुरगाव येथील उपासक उपासिकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी