नांदेड। शहरातात नुक्ताच सैलानी बाबा ट्रस्टच्या वतीने सैलानी बाबा संदलचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात संदल संपन्न झाला. यात शेकडो भाविकांचा समावेश होता.
गेल्या 34 वर्षांपासून सैलानी बाबाचा संदल काढण्याची परंपरा मुख्य पुजारी रघुबाबा यांनी चालू ठेवली आहे. परंतू गेल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनामुळे ही परंपरा खंडीत झाली होती. यावर्षी मात्र मोठ्या उत्सहात संदल संपन्न झाला. 27 मे रोजी गोदावरी नदी येथून सायंकाळी 7 वाजता संदल प्रारंभ झाला. व तो भिमघाट, भय्यासाहेब आंबेडकर नगर, नल्लागुट्टा चाल, पक्कीचाळ, गंगाचाळ मार्गे नवीन डंकीन येथे पोहचला व समारोप झाला.
यावेळी महाप्रसादाचा आस्वाद ही भावीकांनी घेतला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पप्पू जाधव, मुकूंद भोळे, राजू गवारे, बंटी लांडगे, मारोती सवंडकर, बब्बुभय्या यांची उपस्थिती होती. सदरील संदल यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ वाघमारे, केशव नवरे, विकास वाघमारे, मुख्तारभाई, शैलेश वगर, विक्की वाटोरे तुळशीराम कोकरे यांनी परिश्रम घेतले.