नांदेड। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने दि.३० मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मागील अनेक आंदोलनात मागण्या करून अद्यापही काही मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने सिटू कामगार संघटनेच्या स्थापना दिवशी निर्वानीचा इशारा देत बेमुद्दतआंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.वाढत्या महागाईला रोख लावा.सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा.दुय्यम निबंधक, सहनिबंधक व इतरांवर बोगस दस्त नोंदणी व अर्जदारांना खोटे कागजदपत्रे आणण्यासाठी भाग पाडणाऱ्या व प्रवृत करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत आणि निलंबणाची कारवाई करावी.
माहूर देवस्थान जमीन घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करावी व मद्रास शेफर येथील विक्री होत असलेली जमीन पाचशे मीटर शासनाने ताब्यात घेऊन कंपाउंड करावे. अर्जदारांना जीवे मारण्याची धमकी तेथील पुजाऱ्याने दिली आहे.त्याची चौकशी करून मागील निवेदनतील अर्जनुसार योग्य ती कारवाई करावी. गांधी नगर नांदेड येथील प्रजा बालक विद्या मंदिर बोगस शिक्षण संस्थने शिक्षिका आशा गायकवाड व केशव धोंगडे यांना विना मोबदला ३० वर्ष शाळेत शिक्षक म्हणून काम करून घेतले आहे.त्यांचा तिसवर्षाचा पगार देण्यात यावा आणि त्या बोगस शिक्षण संस्थेवर महापालिका, जिल्हा परिषद व पोलीस विभागामार्फत कठोर कारवाई करावी.
मौजे चिखली बु. खूरगाव, नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथील अर्जदार महिलांना घरकुल व लघु उद्योगासाठी दोन लाख रुपये कर्ज देण्यात यावे. मौजे दैठणा तालुका कंधार येथील सिटी चे कार्यकर्ते कॉ.मारुती केंद्रे यांनी केलेल्या मागील निवेदनातील सर्व मागण्या सोडवाव्यात. वजीराबाद सर्वे नंबर 56 बी मध्ये जमीन मालक आलका बुलाने यांचे बेकायदेशीररीत्या प्रकरण निकाली काढून त्यांच्यावर अन्याय केला आहे या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी व दिलेला फिरविणाऱ्यावर कठोर कारवाई करावी.
कॉ. लता गायकवाड अध्यक्ष अ.भा. जनवादी महिला संघटना नांदेड यांच्या आमरण उपोषणातील मागण्यांची तातडीने पूर्तता करावी. मौजे आजनी तालुका माहूर येथे दलीत कुटुंबावरअन्याय करणार्यावर कठोर कारवाई करावी व दि. 8 ते 9 डिसेंबर 2020 रोजी दलित युवक मयत शंकर सटवा कदम यांचा खून करून पुरावे नष्ट करणाऱ्या आजनी येथील 20 ते 22 लोकांचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करावा व या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी. अर्जदार महिलांना तात्काळ रेशन कार्ड देण्यात यावे.
नांदेड शहरामध्ये व जिल्ह्यातील वाढते अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा.मौजे टेम्भूर्णी ता. नायगाव जि. नांदेड येथे विटभट्टीवर काम करणाऱ्या श्यामराव वाघमारे व छबूताई श्यामराव वाघमारे यांचा मुलगा विटभट्टी मालक वेंकटी भास्करे व त्यांच्या मुलाने डांबून ठेवला आहे व दीड लाख रुपयांची मागणी करीत आहेत.त्या विटभट्टी कामगारांच्या मुलाची सुटका करून संबंधित वीटभट्टी मालकावर कठोर कारवाई करावी.आदी मागण्या घेऊन बेमुद्दत उपोषण व धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
या आंदोलनास डाव्या लोकशाही आघाडीचा पूर्ण पाठींबा असून मागण्या ची पूर्तता झाली नाहीतर दि.5 जून रोजी डाव्या आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे समन्वयक यांनी कळविले आहे. उपरोक्त उपोषण व बेमुद्दत धरणे आंदोलनात माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड, उज्ज्वला पडलवार, करवंदा गायकवाड,कॉ. मारोती केंद्रे, कॉ. लता गायकवाड, कॉ. सं. ना. राठोड,कॉ. जयराज गायकवाड, लक्ष्मीबाई पाटणे विद्या पाटणे सुरेखा गंगातीरी सुनीता डांगे, भाग्यरता लेंडाळे सीताबाई अडकिने पद्मावत बाई बारसे,सविता बारसे, पद्मीनबाई शेजुळे, बेबाबाई शेजुळे,ललिता जोगदंड, गोदावरी शेजुळे, कॉ. आनंदा पवार आदींनी सहभाग नोंदविला आहे.